Balasaheb Patil in Masur Programme sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : सत्ताधाऱ्यांकडून जाती भेदातून राजकारणाचा घाट : बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil हणबरवाडी (ता.कराड) येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते.

Umesh Bambare-Patil

-संदीप पारवे

Karad NCP News : राजकीय हेतूने राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचे काम हे शासन करत आहे. सर्व धर्म समभाव संकल्पना जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय मतभेदातून राजकारण करण्याचं काम ही मंडळी करत आहेत.अशा लोकांना आपण सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.

हणबरवाडी (ता.कराड) Karad येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil बोलत होते. यावेळी माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, तानाजीराव साळुंखे, सह्याद्रि कारखान्याचे संचालक जशराज पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीस संगीता साळुंखे, रमेश चव्हाण, संजय घोलप, लहुराज जाधव, पंकज दीक्षित, रमेश जाधव, व्यंकट शेडगे,हणबरवाडी गावचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुका जवळ आल्या की आपल्यासमोर काही मंडळी येतात अनेक वल्गना करतात, साडेतीन ते चार वर्षे ती मंडळी कुठे नसतात.परंतु निव्वळ राजकीय हेतूसाठी ते जवळ येत असतात. तसेच हणबरवाडी धनगरवाडी योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. पहिली ट्रायल आपण यशस्वीपणे घेतली आहे.

दुसऱ्या ट्रायल साठी पाणी शिल्लक आहे सगळं काय आहे परंतु या शिंदे फडणवीस सरकारची मानसिकता नाही.यासंदर्भात प्रशासनातील कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही. प्रशासन सगळे सुस्त झाले आहेत कारण कुणाचा अंकुश त्यांच्यावर नाही. प्रत्येक खात्याला न्याय देण्यासाठी मंत्रिमंडळ आवश्यक आहे. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. या राज्यात ज्यांची वय नाही ती सुद्धा मोठ्या माणसांवर टीका करतात.

द्वेष किती करावा याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत. परंतु अशा चुकीच्या लोकांना सुद्धा पाठीशी घातले जात आहे. राजकीय हेतूने राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचे काम हे शासन करत आहे. ज्यांची पात्रता नाही ते लोक शरद पवार यांच्या विषयी बोलत आहेत. जातीय भेदातून राजकारण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. सर्व धर्म समभाव संकल्पना जपणाऱ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय मतभेदातून राजकारण करण्याचं काम ही मंडळी करत आहेत.अशा लोकांना आपण सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT