Government Medical College of Baramati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरां'चे नाव देणार

Maharashtra Politics: अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

Baramati News: बारामतीत जे नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं आहे त्या महाविद्यालयाला 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय' असे नाव देण्यात यावे. अशी मागणी आम्ही केली होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यासपीठावरुन याबाबत माहिती दिली.

याचवेळी नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं .''अहमदनगर जिल्ह्याचं लवकरत अहिल्यादेवी होळकरनगर असे नामांतर करणार," असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३१ मे) चौंडीत केली.

अहमदनगरच नामांतर लवकरच अहिल्यानगर होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहोत, असंही यावेळी शिंदे म्हणाले. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आणि चौंडीतील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा होते आहे, हे आमचे भाग्य आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT