Ahmednagar Name Change : अहमदनगरच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

Ahmednagar Name Change : अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर होणार

Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: अहमदनगरचं नाव लवकरच अहिल्यादेवी होळकरनगर होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडीत केली. नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील उपस्थित होते.


Eknath Shinde
Ahmednagar Politics: निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न सोडून शिंदे-फडणवीसांनी साधलं अर्ध्या नगरचं राजकारण?

अहमदनगरच नामांतर लवकरच अहिल्यानगर होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आहोत, असंही यावेळी शिंदे म्हणाले. आमच्या सरकारच्या कार्यकाळात आणि चौंडीतील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा होते आहे, हे आमचे भाग्य आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


Eknath Shinde
Kalyan LokSabha News : श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गट कल्याणमध्ये सक्रिय : भोईरांचा लोकसभा जिंकण्याचा निर्धार

दरम्यान, "अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे, असं शिंदे म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com