Rashmi Bagal-Digvijay Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bagal Group Politic's : निवडणुकीतून माघार घेतलेल्या बागल गटाच्या हाती ‘आदिनाथ’च्या सत्तेची चावी!

Adinath Sugar Factory Election : बागल गटाचा पाठिंबा मिळावा, यासाठी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे गट प्रयत्नशील आहेत. मात्र बागलांनी अद्याप आपले पत्ते ओपन केले नाहीत, त्यामुळे बागल ज्यांना पाठिंबा देतील, त्यांचे पारडे निवडणुकीत जड असणार आहे, हे मात्र निश्चित आहे.

आण्णा काळे

Karmala, 11 April : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या रंगतदार वळणावर आली आहे. कारखान्या निवडणुकीत तीन पॅनेल असले तरी खरी लढत ही आजी-माजी आमदारांच्या पॅनेलमध्ये होत आहे. तब्बल 20 वर्षे कारखान्यावर सत्ता गाजविणाऱ्या बागल गटाने मात्र या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच, माजी आमदार जयवंतराव जगतापांनीही माघार घेत आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, ‘आदिनाथ’च्या सत्तेची चावी बागल गटाच्याच हाती असून ते कोणाला पाठिंबा देतात, त्यांचीची कारखान्यावर सत्ता येणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath Sugar Factory) आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे आणि प्रा. रामदास झोळ अशी तिघांची पॅनेल आहेत. मात्र, निवडणुकीतून बागल गट आणि माजी आमदार जयवंतराव जगताप गटानेही माघार घेतली आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, बागलांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेली 20 वर्षे बागल गटाच्या (Bagal Group) ताब्यात होता. मात्र, मागील पंचवार्षिकमध्ये कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. सध्या कारखाना बंद अवस्थेत आहेत, त्यामुळे बागल गटाने कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, बागलांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे.

साखर कारखानदारीमुळे बागलांचे राजकारण अडचणीत सापडले आहे. मकाई सहकारी साखर कारखान्यावर स्थापनेपासून, तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर गेली 20 वर्षांपासून बागल गटाची सत्ता होती. साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकारण करत असताना बागल गटाच्या अडचणी कारखान्यामुळे वाढत गेल्या आणि हातात असणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी या सत्ता गेल्या. साखर कारखानदारीमुळे आपले राजकारण अडचणीत आले आहे, हे लक्षात आल्यानेच त्यांनी सध्याच्या निवडणुकीपासून लांब हात राहणे पसंत केले आहे.

भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मकाई साखर कारखान्याला 140 कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे, त्यामुळे आणखी एक आजारी कारखाना ताब्यात घेऊन चालविणे, अडचणीचे ठरू शकते हे लक्षात घेऊन बागल गटाने आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले आहे. बागलांनी ‘आदिनाथ’च्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते कोणाला पाठिंबा देणार, त्यावर निकाल अवलंबून असणार आहे.

बागल गटाचा पाठिंबा मिळावा, यासाठी आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे गट प्रयत्नशील आहेत. मात्र बागलांनी अद्याप आपले पत्ते ओपन केले नाहीत, त्यामुळे बागल ज्यांना पाठिंबा देतील, त्यांचे पारडे निवडणुकीत जड असणार आहे, हे मात्र निश्चित आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT