Shivsena News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Operation Tiger : ठाकरेंच्या शिवसेनेला गावगाड्यापर्यंत भगदाड! अख्खी ग्रामपंचायतच शिंदेंच्या शिवसेनेत

Uddhav Thackeray Shivsena Politics : गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्कांवर धक्के बसत आहेत. कोकणात अनेक दिग्गज नेते त्यांना जय महाराष्ट्र करत आहेत.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : कोकणात सध्या ऑपरेशन टायगर जोरात सुरू असून आता ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले जातेय. अशातच आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचे हादरे ग्रामपंचायतीपर्यंत गेले आहेत. आता अख्खी ग्रामपंचायतच शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात गेली आहे. तालुक्यातील श्रावण गावात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला खिंडार पाडले आहे. सामंत यांनी ऑपरेशन टायगर घडवून आणत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना शिवसेनेत घेतलं आहे.

तालुक्यातील श्रावण गावात शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ठाकरे गटाला खिंडार पाडले. आमदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन श्रावण येथील ठाकरे गटाचे उपसरपंच दुलाजी परब यांच्यासह सरपंच नम्रता मुदाळेंचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे. फक्त सरपंच- उपसरपंच न फोडता थेट ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनाच आपल्या उपस्थितीत शिवसेनेत करून घेतला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी काहीच दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे हा पक्षप्रवेश झाल्याची आता चर्चा जिल्ह्यात होताना दिसत आहे. नितेश राणे यांनी ठाकरे गटासह महायुतीतील सरपंचांना निधी देणार नाही अशी घोषणा केली होती. तर गावचा विकास करायचा असेल तर भाजपमध्ये या असे वक्तव्य केलं होते. तर विकास निधीवर आधी हक्क भाजप आणि महायुतीच्या लोकांचा असेल. निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले होते.

यानंतर आता श्रावणच्या सरपंचांसह सर्व सदस्यांनी शिवसेनेला पसंती देत प्रवेश केला आहे. यावेळी मागील दहा वर्षापासून गावचा रखडलेला विकास येत्या दोन वर्षात केला जाईल. यासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

...तर दोन वर्षांत विकास दिसेल

सामंत म्हणाले, खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर ही चारही माणसे आपली आहेत. त्यामुळे योग्य समन्वय साधून काम केले तर दहा वर्षांत जो विकास दिसला नाही तो या दोन वर्षांत दिसेल. रोजगार देण्यासाठी नीलेश राणे प्रयत्नशील असून सरपंच व पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहेत. शिवसेनेत प्रवेश केलेले परब यांचा योग्य मान सन्मान राखला जाईल. ते जी कामे देतील, ती कामे नीलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT