Kirit Somaiya Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोमय्यांचा जरंडेश्‍वरला जाण्याचा मुहूर्त आता सहा ॲाक्टोबर

शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची कथित प्रकरणे एकामागोमाग उघड करीत असल्याने सोमय्या सध्या चर्चेत आहेत.

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या जरंडेश्‍वर कारखान्याला येत्या सहा ऑक्टोबरला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर त्याचदिवशी दुपारी बारामती येथे जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सोमय्या यांनी आज सांगितले.

शिवसेनेसह राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची कथित प्रकरणे एकामागोमाग उघड करीत असल्याने सोमय्या सध्या चर्चेत आहेत. ग्रमाविकास मंत्री हसन मुश्रिफ व त्यांच्यावर जावयावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत मुश्रिफ यांच्याविरोधात दोन दिवसांपर्वी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचे सोमय्या यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, जरंडेश्‍वर कारखान्याच्या सभासदांनी गेल्या आठवड्यात मुंबईत येऊन आपली भेट घेतली आहे. त्यांनी कारखान्यावर येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे येत्या सहा ऑक्टोबरला आपण कारखाना स्थळावर जाणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.कारखान्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बारामतीला जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते मंत्री अनिल परब तसेच राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची अनेक प्रकरणे बाहेर काढण्यात आघाडीवर असलेले सोमय्या येत्या काही दिवसात कॉंग्रेसच्या आणखी दोन मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावण आहे.ते दोन मंत्री कोण असू शकतील, अशी चर्चादेखील सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉंग्रेसच्या या मंत्र्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सोमय्या करीत आहेत.कागदपत्रे गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबत ते गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, अब्रुनुकसानीच्या दाव्यावर येत्या पाच ऑक्टोबरला सोमय्या कोर्टात हजर राहणाऱ्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT