मिरवणूक प्रकरण : गुंड गजानन मारणेचा जामीन अर्ज फेटाळला

मिरवणुकीद्वारे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मारणेविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल आहे.
Gajanan Marne
Gajanan MarneSarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कारच्या ताफ्यातून मिरवणूक काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत कुख्यात गुंड गजानन मारणे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी हा निकाल दिला.

मिरवणुकीद्वारे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मारणेविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातदेखील मारणे याचा जामीन यापूर्वी फेटाळण्यात आला आहे. पुणे-बंगळूर बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकात १५ फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला होता. मारणे आणि त्याच्या साथीदारांनी मिरवणुकीची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करून दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी मारणे आणि साथीदारांविरोधात कोथरूड, वारजे तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Gajanan Marne
मतदारयादीत छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार वडगाव शेरी मतदारसंघात

मारणे याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. गजा मारणे हा टोळी चालवितो. तो आणि त्याच्या साथीदारांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, अपहरण, दंगा करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर मालमत्ता बळकाविणे, जाळपोळ आदी गुन्हे दाखल आहेत. तसेच मोका कायद्यान्वयेही गुन्हे दाखल आहेत, असे ॲड. कावेडिया यांनी न्यायालयास सांगितले.

Gajanan Marne
भाजपाशी युतीची चर्चा तूर्त नको : राज ठाकरेंची भूमिका

आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध सुरू

आरोपींनी दहशत निर्माण करीत सरकारी कर्मचाऱ्‍यास ढकलून दिले होते. तसेच कारचे सनरूफ उघडे ठेवून स्वत:ला बाहेर प्रदर्शित करून दहशत माजवीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आरोपीने कोणत्या हेतूने रॅली काढली मिरवणुकीचे आयोजन कोणी केले? तसेच यासाठी आर्थिक पुरवठा कोणी केला? याचा शोध घ्यायचा असल्याचा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.

EDited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com