Satara News: माझ्याकडून अनावधानाने 'सैतान' शब्द वापरला गेला आहे. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली. मला सेनापती गावगाड्याकडे येत आहे, त्याला रोखूया असं म्हणायचं होतं, असे स्पष्टीकरण रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बाोलताना दिले.
माजी मंत्री सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी शरद पवार Sharad Pawar यांच्यावर 'सैतान' हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीकेची झाोड उठली. यावर सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांपुढे आपली भूमिका मांडली.
देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला याचं मोठं श्रेय द्यावं लागेल. शरद पवार यांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केलं, त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली, गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला आहे.
त्यामुळे शरद पवार यांना गावगाड्याकडे धावतं यावं लागत आहेत. 'जैसी करणी वैसी भरणी' कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागते. शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावे लागत आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये, अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.
शरद पवार यांनीदेखील समृद्धी महामार्गाच्या अपघात झाला, त्यावेळेस काही लोक "देवेंद्रवासी" झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा, परंतु शरद पवार यांनी तो अनावधानाने केला होता. म्हणून तुम्ही आता गोळ्या घालणार का. गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये थोडाफोडी कोणी केली, याचा इतिहास तपासावा लागेल, असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.
"माझ्याकडून अनावधानाने "सैतान" हा शब्द गेला आहे. गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा इंडियातील लोकांना प्रस्थापितांना कडवट लागली. सेनापती गावगाड्याकडे येत आहे, त्याला रोखूया असे मला म्हणायचे होते. सरदारांची जमवाजमव होता कामा नये, ही त्यामागची माझी भूमिका होती, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.