Prithviraj Chavan- Narendra Modi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : ''...तर मोदी लोकशाही जिवंत ठेवणार नाही!'' : काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

Congress Vs Bjp : एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maan Congress News : भाजप जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करुन दंगली घडवितो. या देशात पुन्हा भाजपचे सरकार आले तर मोदी लोकशाही जिवंत ठेवणार नाहीत, असा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. भाजपला मतदान करून देशाचे आणि स्वतःचे नुकसान करून घेऊ नका असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

माढा लोकसभा मतदार संघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आज दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह देशमुख उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) म्हणाले, देशासह राज्यातील वातावरण बदलू लागले आहे. विश्वासू आणि सामान्य जनतेचा पक्ष म्हणून जनता काँग्रेसकडे पाहतेय. माढा मतदार संघातील पुढील खासदार हा काँग्रेस पक्षाचा असेल. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे.

मोदी सरकार(Modi Government)मुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. संविधान वाचेल की नाही सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुले आहेत.

धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, माढा मतदारसंघात स्वतंत्र लढल्यास खासदार काँग्रेस(Congress) चाच होईल. मोहन जोशी म्हणाले, पृथ्वीराज बाबांमुळे इथला आमदार घडला. पाणी आणण्यामध्ये बाबांचा मोठा हात आहे. तरी देखील इथला आमदार बाबाचा काही संबंध नाही असे म्हणत फिरत आहे. येत्या निवडणुकीत त्याला त्याची जागा दाखवून द्या.

'' जयकुमार गोरे हे जलनायक नव्हे तर खलनायक...''

मी माण आणि खटावमध्ये दोन सूतगिरणी उभ्या केल्या. बोराटवाडीच्या गड्याने पिठाची गिरणी तरी उभी केलीय का? युवकांना रोजगार मिळावा म्हणून साखर कारखाना उभारायचे नियोजन मी केले तर लगेच इथला आमदार आडवा पडला.

महादेव जानकरांनी आवाज उठविल्यामुळे सुरु झालेल्या चारा छावण्यांची बिले रखडविण्याचे काम या बहाद्दराने केले. ज्या पृथ्वीराज बाबांमुळे माण खटावला पाणी आले त्या बाबांचे नाव घेण्याची दानत या आमदाराकडे नाही. हा कसला जलनायक हा तर खलनायक असा जबरदस्त टोला रणजितसिंह देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT