Sunil Shelke On NCP : अजितदादांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? सुनील शेळकेंनी सांगितला आकडा

Maval NCP News : अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सत्तेत सामील
Sunil Shelke
Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटीर अजित पवार गट, भाजप-शिंदे शिवसेनेच्या राज्य सरकारमध्ये सामील झाला. `ईडी`चा ससेमिरा चुकविण्य़ासह इतर कारणे त्यामागे असल्याची चर्चा त्यावर आतापर्यंत रंगली. मात्र, विरोधात असल्याने वर्षभर अडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत सामील झालो. तसेच अजित पवारांसोबत पक्षातील ४५ आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादीतील अजितदादा गटाचे आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी केला. (Latest Political News)

Sunil Shelke
Nawab Malik And NCP Crisis : नवाब मलिकांसाठी शरद पवार-अजितदादा गटांकडून 'फिल्डिंग'; नेमकं काय झालं ?

महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांचे ते आल्यानंतर आमची सुरु झालेली कामे निधीअभावी अडली होती. तर,अनेक कामांना स्थगिती मिळाली होती. ती उठवून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत सामील झालो, असा दावा सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी वडगाव मावळ येथील पत्रकारपरिषदेत केला.

अजितदादांबरोबर पक्षाचे ४५ पेक्षा जास्त आमदार असल्याचा दुसरा दावाही त्यांनी यावेळी ठोकला. त्याचवेळी आपण पवारसाहेब आणि अजितदादा अशा दोघांसोबतही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातून राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याच्या सुरु असलेल्या चर्चेला बळ मिळाले आहे.

Sunil Shelke
Congress Election Strategy : काँग्रेसची रणनीती ठरली; लोकसभेच्या २० जागा जिंकण्याचे टार्गेट

सत्तेत सामील होताच गेल्या दीड महिन्यात मावळसाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी आणला. ६५ कोटी रुपयांच्या कामावरील स्थगिती उठवली, तर उऱलेल्या वर्षभराच्या कालावधीत आणखी पाचशे कोटी रुपयांचा निधी आणल्य़ाशिवाय राहणार नाही, असा निर्धार शेळकेंनी यावेळी बोलून दाखवला.

मावळचे (Maval) खासदार (शिंदे शिवसेनेचे), आमदार (स्वत: शेळके) आणि माजी आमदार (भाजपचे बाळा भेगडे) असे तिघेही सत्तेमध्ये असल्याने जनतेला आता कुठलेच कारण देता येणार नाही, असे ते म्हणाले. तेरा वर्षापासून बंद पडलेल्या आणि पिंपरी चिंचवडला मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेबाबत स्थानिक शेतकरी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com