Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीसांचा इशारा : 'हा देवाभाऊ प्रत्येक गोष्टीत तुमच्या पाठीशी राहील; पण चुकीला माफी नाही...'

CM Solapur Tour : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना पारदर्शक व प्रामाणिक कारभाराचा इशारा दिला. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, चूक झाल्यास कठोर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 28 April : कुठल्याही परिस्थितीत पारदर्शी, प्रामाणिक कारभार झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, एखाद्याला पदावरून काढावं लागलं किंवा एखादं पद हातातून गेलं तरी चालेल. लोकांनी पारदर्शी कामासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभा राहील. पण चुकलात, तर चुकीला माफी नाही, हेही लक्षात ठेवा, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना दिला.

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकीत दैदिप्यान यश भारतीय जनता पक्षाने मिळविले आहे. त्या यशाबद्दल कृतज्ञता मेळावा आणि लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. त्या वेळी त्यांनी नवनिर्वाचित भाजप पदाधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विश्वास टाकल्याबद्दल सोलापूरच्या (Solapur) जनतेला हात जोडून नमन करतो. भारतीय जनता पक्ष सोलापूरकरांच्या कर्जात आहे, हे कर्ज आम्ही विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या प्रेमाच्या कर्जात तर जन्मभर राहू. पण विकासासाठी जे कर्ज दिले आहे, ते येत्या पाच वर्षांत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविला. अकरांपैकी दहा सभापती भाजपचे झाले आहेत. महिलांचे आरक्षण काँग्रेसने दिल्लीत रोखले असले, तरी सोलापुरात ५६ टक्के महिला निवडून आणण्याचे काम केले आहे, असा दावाही फडणवीस यांनी केला.

ते म्हणाले, सोलापुरातील विजयाचे पहिले शिल्पकार शहर आणि जिल्ह्याची जनता आहे. दुसरा शिल्पकार भाजपचा कार्यकर्ता आहे. अर्थातच निवडणुकीचे नेतृत्व करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांशी समन्वय साधून हे यश मिळविले. सर्व आजी माजी आमदारांशी संवाद ठेवून त्यांनी हे यश मिळविले आहे. हा विजय विकासाचा आहे, मोदींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिर्वतनाचा विकास आहे.

मी माझ्यामुळेचे निवडून आले किंवा आलोय, असं अनेकजण समजतात. लोक जसं विकास पाहतात, तसं ते तुमचा व्यवहारही पाहतात. एकवेळ विकास कमी झाला तरी चालेल पण जनतेशी व्यवहार चांगला असला पाहिजे. भाजपच्या लोकप्रनिधींना सांगतो की, मोदी यांनी काय काम केले, याबरोबरच स्थानिकांनी व्यवहार कसा केला, हेही पाहिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, व्यवहाराचं तुम्ही बघा, लोकांशी तुमचा व्यवहार कसा, हे तुम्हीच ठरावा, त्याची कळजी तुम्ही घ्या. विकासाची काळजी माझ्यावर सोडा. तुम्हाला जे लागेल आणि तुम्ही जे मागेल, ते देण्याचे काम मी निश्चितपणे करेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT