Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : सदाभाऊ कडाडले; 'शेतकऱ्यांच्या जनावरांची गाडी अडवून लुटणारे गोरक्षक नसून गोभक्षक आहेत...'

Sangola Morcha News : राज्यात सध्या दोन कोटी ८५ लाख पशुधन आहे. त्यापैकी केवळ एक टक्का जनावरे गोशाळांमध्ये आहेत. उर्वरित जनावरे शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदार सांभाळत आहेत. त्यामुळे खरा गोठा हा शेतकऱ्यांचाच आहे.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 21 August : ‌देशी गोवंशाचे जतन करणारे खरे गोरक्षक शेतकरीच आहेत. ‘शो’ची कुत्री पाळणाऱ्या शहरातील लोकांनी आम्हा शेतकऱ्यांना गाईवर प्रेम कसे करावे, हे शिकवू नये. तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांची गाडी अडवून त्यांची लूट करत आहेत. तुम्ही गोरक्षक नसून गोभक्षक आहात. आता आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार आहोत, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी तथाकथित गोरक्षकांना दिला.

गोवंश हत्या आणि गोरक्षकाविरोधात शेतकरी, व्यापारी, पशुपालक कृती समितीचा सांगोला (Sangola जि. सोलापूर) येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत आज (ता. 21 ऑगस्ट) सांगोल्यात आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना खोत यांनी हा इशारा दिला आहे.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले, शेतकरी देशी गाईंना कधीच बाजारात विकायला आणत नाही. मात्र, दुधाळ जनावरे विक्रीला नेताना शेतकऱ्यांना अडवले जाते. तथाकथित गोरक्षक शेतकऱ्यांची गाडी अडवून त्यांची लूट करीत आहेत, यामुळे शेतकऱ्यांच्या गाई-म्हशींचा बाजार भाव मोठ्या प्रमाणात पडला आहे. पण, शेतकऱ्यांच्या जनावरांचे बाजार बंद करण्याचा डाव आम्ही चालू देणार नाही.

कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी. पोलिसांनी कायद्याच्या गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करू नयेत. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून एचएफ आणि होमिजीनाईजड पाशात्य आणि संकरीत बैल यांना कत्तलीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करताना शेतकऱ्यांच्या जनावरांच्या विक्रीत कोणीही अडथळा आणल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही आमदार खोत यांनी दिला.

आमदार खोत म्हणाले, राज्यात सध्या दोन कोटी ८५ लाख पशुधन आहे. त्यापैकी केवळ एक टक्का जनावरे गोशाळांमध्ये आहेत. उर्वरित जनावरे शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदार सांभाळत आहेत. त्यामुळे खरा गोठा हा शेतकऱ्यांचाच आहे. गोशाळेचा दर्जा शेतकऱ्यांच्या गोट्यालाच द्यावा.

'राज्यात देशी गाई, जर्सी, होस्टन अशा दुधाळ जातींची एक कोटी १५ लाख, म्हैशीची संख्या ४४ लाख, शेळ्या ९० लाख, मेंढींची संख्या २८ लाख असे एकूण दोन कोटी ८५ लाख पशुधन आहे. राज्यात दररोज अडीच कोटी लिटर दूध तयार होते, असेही सदाभाऊ खोत यांनी नमूद केले.

गोरक्षण छावण्यातील जनावरांची आकडेवारी जाहीर करून त्या ठिकाणा होणाऱ्या गैरव्यवहारांवर कारवाई करण्यात यावी. जनावरांची कायदेशीर खरेदी-विक्री आणि वाहतूक पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी सरकारकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT