Shetti-Khot News : जुने मित्र पुन्हा एकत्र! राजू शेट्टी, सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर शेजारी बसले, पण...; व्हिडिओ व्हायरल

Shetti-Khot News : एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले.
Raju Shetti_Sadabhau Khot
Raju Shetti_Sadabhau Khot
Published on
Updated on

Shetti-Khot News : एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत एकाच सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इंदापूरच्या कोर्टातला हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर त्याची खूपच चर्चा सुरु आहे.

Raju Shetti_Sadabhau Khot
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या क्लिनचीटविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देणार! सुरेश धस यांनी नेमकं काय म्हटलंय?

2011मधील शेतकरी आंदोलनाच्या न्यायालयीन प्रकरणासाठी आज इंदापूरच्या कोर्टात माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. वकिलांच्या बार रूममध्ये दोघे एका सोफ्यावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. शेजारी बसले असले तरी ते एकमेकांकडं बघतही नव्हते त्यामुळं त्यांच्यात संवादही झाला नसल्याचं सुत्रांकडून कळतंय. व्हिडिओत या दोघांव्यतिरिक्त आणखी तीन-चार जण या सोफ्यावर बसलेले दिसत आहेत.

सर्वजण निवांत बसलेले दिसत असले तरी सदाभाऊ खोत हे काहीसे अवघडल्यासारखे दिसत आहेत. राजू शेट्टींच्या शेजारी बसल्यामुळं कदाचित त्यांना अवघडल्यासारखं वाटत असावं. त्यांच्या हातात मोबाईल असून ते मोबाईलवर बोलत आहेत तर राजू शेट्टी मोबाईलवर काहीतरी पाहत असताना दिसत आहेत. पण संवाद नसला तरी शेट्टी अन् खोत हे एकाच फ्रेममध्ये दिसत असल्यानं त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

Raju Shetti_Sadabhau Khot
Nagpur Congress: नागपूरचे तीन युवा नेते हर्षवर्धन सपकाळांच्या टीममध्ये; थेट महासचिव म्हणून मिळाली पदोन्नती

दरम्यान, या बाररुममध्ये काही काळ वाट पाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी थेट सदाभाऊंवर निशाणा साधला. तुम्ही दोघे एका केस संदर्भात कोर्टात एकत्र आला आहात भविष्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एकत्र दिसणार का? असा प्रश्न पत्रकारांनी शेट्टी यांना विचारले असता शेट्टींनी थेट सदाभाऊ खोत यांना टोला लगावला.

शेट्टी म्हणाले, “सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल असे मला वाटत नाही,” असा थेट टोला शेट्टींनाही लगावला. संघटनेतील मतभेदांमुळे आधीच तणावग्रस्त असलेले हे दोन्ही नेते, आजच्या प्रसंगामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राजकीय वर्तुळात यानंतरच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com