Nagpur, 16 December : महायुतीमधील तीनही पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदं बाजूला काढून ठेवायला हवी होती. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. महायुतीमधल्या तीन पक्षांनी आमच्याकडून नांगरट करून घेतली. जेव्हा आमचं शेत नांगरायची वेळ आली, तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले आणि आम्ही एकटंचं शेतात उभं आहे, अशा शब्दांत मंत्रिपदापासून डाललेल्या आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
खोत म्हणाले, गावगाड्यांमध्ये शेतीचे कामं सावड करून केली जातात. तुझं दोन एकर नांगरून दिलं, तर माझंही अर्धा एकर नांगरून दे, अशी गावाकडची पद्धत आहे. पण दुर्दैवानं काय झालंय की आम्ही तीनही पक्षांचं प्रामाणिकपणाने त्यांचं शेत नांगरून दिलं. पण, ज्या वेळी आमचं शेत नांगरायची वेळ आली, तेव्हा बैलाला आमच्या शेतात थांबूसुद्धा दिलं नाही. बैलासकट गडी घेऊन गेले. आम्ही आपलं शेतात उभं आहे.
मी आणि गोपीचंद पडळकर विस्थापितांसाठी लढत आलोय. आमचा संघर्ष अजूनही सुरू आहे. जे विस्थापित आहेत, कष्टकरी लोकांचा वर्ग असतो. त्यांचा संघर्ष कधीच संपत नाही. त्यात आम्ही लहानाचे मोठे झालो. पण, देवाभाऊसारखे (Devendra Fadnavis) नेतृत्व आहे, याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी निर्णय घेतले. ते मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची अपेक्षा होती. ते मुख्यमंत्री झाल्याचे समाधान आहे, असेही खोत यांनी स्पष्ट केले.
खोत म्हणाले, सत्तेत असूनही संघर्ष आमचा सावत्र भाऊ आहे. त्यामुळे त्याला आम्ही सोडू शकत नाही. आमचा संघर्ष दीर्घकालीन आहे. आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नव्हता. ज्या प्रश्नासाठी लढलो, रक्त सांडलं, ते कृषी खातं मिळालं असतं, तर आवडलं असत. शेतकऱ्यांसाठी चांगली धोरणं आणता आली असती. पण, संघर्ष आमच्या सोबत आहे
या अधिवेशनात कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे आणि सिंचन प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे. महायुती सरकारकडून कर्जमाफी नक्की होईल. पण, संघर्ष आमच्या वाट्याला आलेला आहे, यापुढेही आम्ही संघर्ष करत राहू, अशी भावना आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.