Mahayuti Cabinet : गडकरी समर्थक असल्याचा खोपडेंना पुन्हा फटका; नाराज शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Vidarbha BJP Politic's : विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडूण येणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक आमदार कृष्णा खोपडे यांच्याही नावाची चर्चा संभाव्य मंत्री म्हणून होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
Devendra Fadnavis-Krishna Khopde-Nitin Gadkari
Devendra Fadnavis-Krishna Khopde-Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 16 December : मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शिस्तप्रिय भाजपतही नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार खेचणारे आणि विदर्भातून सर्वाधिक मतांनी निवडूण येणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक आमदार कृष्णा खोपडे यांच्याही नावाची चर्चा संभाव्य मंत्री म्हणून होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या पूर्व नागपूरमधील पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला. सोबतच सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपचे राजीनामे दिले आहेत.

कृष्णा खोपडे (Krishna Khopde) हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत. राज्यात 2014 मध्ये भाजपची सत्ता आली, तेव्हा नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्यासाठी आमदराकीचा राजीनामा देऊन पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ रिकामा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात नागपूर जिल्ह्यातील चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री झाले. त्यांच्याकडे नागपूरचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले होते. त्यामुळे खोपडे यांची कामगिरी झाकोळली गेली.

कृष्णा खोपडे यांनी सर्वप्रथम पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपला (BJP) खाते उघडून दिली होते. त्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. तत्कालीन कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचा त्यांनी धक्कादायक पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात वातावरण होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीसुद्धा धाकधूक वाढली होती. ते निवडून येतील मात्र मताधिक्य फारसे राहणार नाही, असेच सर्वत्र चित्र होते. नितीन गडकरी सुमारे एक लाख १७ हजार मताधिक्यांनी निवडून आले. यात पूर्व नागपूरचा सर्वाधिक वाटा होता.

Devendra Fadnavis-Krishna Khopde-Nitin Gadkari
Rajesh Kshirsagar : अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्याचा हवाला देत राजेश क्षीरसागरांनी मंत्रिपदाबाबत केला मोठा दावा

पूर्व नागपूर मतदारसंघातून गडकरी यांना तब्बल ७३ हजारांचे मताधिक्य खोपडे यांनी मिळवून दिले होते. हा गडकरींचा करिष्मा आहे. खोपडे यांचे योगदान नाही, असे दावे त्यावेळी अनेकांनी केले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत खोपडे हे तब्बल १ लाख १३ हजारांच्या मताधिक्यांनी निवडून आले. महाविकास आघाडीचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांना ५० हजार मतांचाही आकडा गाठता आला नाही.

देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री असतानाही त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. अडीच वर्षांच्या महायुतीच्या काळातही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता चौथ्यांदा निवडून आल्यानंतर तरी पक्षातर्फे त्यांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. फडणवीस यांच्या नेतृत्वात एका जागेचा अपवाद वगळता संपूर्ण मंत्रिमंडळ महायुतीने जाहीर केले. मात्र, खोपडे यांना स्थान देण्यात आलेले नाही.

Devendra Fadnavis-Krishna Khopde-Nitin Gadkari
NCP Politic's-video : मंत्रिमंडळातील एक जागा कोणासाठी रिक्त ठेवली?....राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट नावच घेत डेडलाईनही सांगितली...

आमदार कृष्णा खोपडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी आता खोपडे यांना आणखी अडीच वर्षे वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. नितीन गडकरी यांचे समर्थक असल्याने त्यांना डावलण्यात येत असल्याची चर्चा भारतीय जनता पक्षात आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com