Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुनील गडाखांना घरी बसण्याची वेळ : आरक्षणामुळे नेवाशात 'महिलाराज'

अहमदनगर जिल्हा परिषद व नेवासे पंचायत समिती निवडणुकीसाठी काल आरक्षण सोडत काढण्यात आली.

विनायक दरंदले

सोनई ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद व नेवासे पंचायत समिती निवडणुकीसाठी काल आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणात आठ पैकी सात गटात महिलांचे आरक्षण निघाल्याने गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुरुषांचा हिरमोड झाला आहे.अर्थ व पशुसंवर्धन सभापती म्हणून लक्षवेधी काम केलेल्या सुनील गडाखांना घरी बसावे लागणार असल्याने खरवंडी आणि सोनईतील युवकांचे चेहरे पडले आहेत. गणाच्या आरक्षणात सोळा पैकी आठ महिलांना संधी भेटणार आहे. ( Time for Sunil Gadakh to sit at home: 'Mahilaraj' in Nevash due to reservation )

आताच्या खरवंडी गटात सुनील गडाख, बेलपिंपळगाव गटात दादासाहेब शेळके तर भेंडे गटात भाजपाचे दत्तात्रेय काळे सदस्य होते. सोनई, चांदे, कुकाणे, भानसहिवरे गटात महिला सदस्य होत्या.सात पैकी पाच सदस्य माजी मंत्री शंकरराव गडाख गटाचे होते. एक सदस्य भाजपाचा तर एक राष्ट्रवादी काँग्रेसचा होता.

गडाख परिवारातील सुनील गडाख यांनी खरवंडी गट मॉडेल करण्याचा संकल्प करुन करोडो रुपायाचा निधी आणला होता. तालुक्यात फक्त पाचेगाव गट पुरुषासाठी असला तरी तो अनुसूचित जमातीसाठी निघाला असल्याने गडाखांसह सर्व पुरुष पुढाऱ्यांची जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच पंचायत झाली आहे.

आरक्षण होण्याच्या आगोदर अनेक संभाव्य पुरुष पुढाऱ्यांनी जिल्हा परिषद गटासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र तालुक्यातील आठ पैकी सात गटात महिलांचे आरक्षण निघताच सर्वांचेच हातपाय गळाले आहेत. या आरक्षणाने राजकारणाचे सर्व समीकरण होत्याचे नव्हते झाले असुन माजी मंत्री गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटावर महिला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषद गटाचे आरक्षण याप्रमाणे सोनई - (इतर मागास, महिला), शनिशिंगणापुर - (सर्वसाधारण,महिला), चांदे- (अनुसूचित जाती,महिला), पाचेगाव - (अनुसूचित जमाती, पुरुष), भानसहिवरे - (इतर मागास, महिला), भेंडे-बु-(सर्वसाधारण, महिला), सलाबतपुर - (सर्वसाधारण, महिला), बेलपिंपळगाव- (अनुसूचित जमाती,महिला)

पंचायत समिती गणाचे आरक्षण याप्रमाणे सोनई - सर्वसाधारण (महिला), घोडेगाव- अनुसूचित जाती, शनिशिंगणापूर - सर्वसाधारण (महिला), खरवंडी - सर्वसाधारण(महिला), करजगाव - ना.मागास प्रवर्ग, चांदे- सर्वसाधारण, देडगाव - ना.मागास प्रवर्ग, बेलपिंपळगाव - ना.मागास प्रवर्ग(महिला), प्रवरासंगम - अनुसूचित जाती(महिला), खामगाव - सर्वसाधारण, कुकाणे- सर्वसाधारण, सलाबतपूर - सर्वसाधारण, भेंडे - ना.मागास प्रवर्ग(महिला), मुकिंदपूर - सर्वसाधारण(महिला), पाचेगाव - अनुसूचित जमाती, भानसहिवरे - सर्वसाधारण (महिला) गटाची व गणाची नवीन रचना समोर येताच तालुक्यात राजकीय चर्चेचा फड सुरु झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT