Banner in Parner Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congratulate Narendra Modi : शेतमालाचे भाव गडगडले; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा चक्क 'फ्लेक्स'च लागला

Ahmednagar BJP Vs Congress, NCP : भाजपविरोधक आक्रमक झाल्यानंतर शेतकऱ्यांचीही भावनांना वाट ?

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आधी दूध, नंतर टोमॅटो आयात केले; तर आता कांद्यावर निर्यात कर लागू केल्यानंतर आणि लवकरच साखर निर्यातबंदीची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारच्या या धोरणांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. परिणामी राज्यातील शेतकरी संतप्त झाले असून केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असल्याचे दिसून येतात. यातूनच नगर जिल्ह्यातील जवळे गावात लागलेल्या एका 'फ्लेक्स'वरील अफलातून मजकुराने ही शेतकऱ्यांची नाराजी ठळकपणे दिसून येत आहे. (Latest Political News)

'टोमॅटोचे भाव पाडून झाल्यावर कांद्याचे भाव देखील पाडण्यासाठी तातडीने केलेल्या प्रयत्नाबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन' अशा मजकुराचा एक 'फ्लेक्स' पारनेर तालुक्यातील जवळे गावातील बाजारपेठेतील रस्त्यावर लावला आहे. हा 'फ्लेक्स' ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेताच सोशल मीडियावरही चांगलाच 'व्हायरल' झाला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या 'बॅनर'च्या माध्यमातून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष असल्याचे स्पष्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी देशात टोमॅटोचे दर वाढले होते. मात्र केंद्र सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात करून देशातील टोमॅटोचे भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परिणामी शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्यावर पाणी फिरल्याची टीका विरोधकांनी केली. आता नगरमधील शेतकऱ्यांनी 'बॅनर'च्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे अभिनंदन करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. पारनेर तालुक्यातील जवळा गावातील मुख्य बाजारपेठेत अज्ञातांनी मोदी सरकारचे अभिनंदन करण्याचा 'बॅनर' लावला आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांचा विचार न करता हेकेखोर पद्धतीने निर्णय घेत असल्याची टीकाही राज्यभरातून होत आहे. हा धागा पकडून जावळे येथे 'व्हायरल' झालेल्या फलकावर 'नवीन हिटलर शाही' असाही मजकूर या फ्लेक्स लावण्यात आला आहे. हा फलक नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान, या 'बॅनर'ची चर्चा सोशल मीडियावर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो तातडीने काढून टाकला आहे. या 'बॅनर'मुळे नगरमधील भाजप आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी यांच्यात आता 'फ्लेक्स वॉर' होण्याची शक्यता आहे. याला भाजप कसे उत्तर देते, याकडे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT