Balasaheb Thorat, Rohit Pawar, Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb Thorat, Rohit Pawar, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Congress Vs BJP : नेहरू की मोदी ? चांद्रयानातील 'इस्रो'च्या यशातील श्रेयासाठी नेत्यांची उड्डाणे !

Balasaheb Thorat Vs Radhakrishna Vikhe Patil : नगरमध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने
Published on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : भारतासाठी 'चांद्रयान 3' मोहीम इस्रोच्या अंतराळ संशोधन आणि मोहिमेतील एक मैलाचा दगड ठरला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयानाने बुधवारी सायंकाळी यशस्वी लँडिंग केले. जगाला आश्चर्ययाचा धक्का देत 'इस्रो'ने आपल्या यशस्वी मोहिमेतील शृंखलेत मानाचा तुरा रोवला आहे. देशासाठी ही मोठी गौरवाची बाब असली तरी नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांनी इस्रोच्या कामगिरीला श्रेय देतानाच त्यात आपापल्या शीर्ष राजकीय नेतृत्वाला, धोरणात्मक विचारधारेला ओढण्याचा प्रयत्न करून श्रेयसाठी राजकीय उड्डाणे सुरू झाल्याचे दिसून आले आहे. (Latest Political News)

'इस्रो' असो वा जगातील कोणत्याही देशातील संस्थेसाठी संशोधनाच्या बाबतीत त्या-त्या देशाची तत्कालीन भूमिका ही महत्वपूर्ण ठरलेली आहे. ही एक दीर्घ प्रकिया असून त्यात देशाचे नेतृत्व आणि शास्त्रज्ञांचे, संशोधकांचे सातत्यपूर्ण परीक्षण यातून सुरू असलेल्या मोहिमांचे यशापयश सुरू असते. मात्र मोहिमांच्या यशस्वीतेनंतर पुढे असा बाबींना राजकीय वास येतोच. इस्रोचे अभिनंदन करतानाच भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेत आल्यानंतर गेल्या नऊ वर्षातील त्यांच्या यशस्वी नेतृत्वावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न बहुतांशी नेत्यांनी केला. तर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडून इस्रोच्या स्थापनेत पंडित नेहरू आणि पर्यायाने काँग्रेसची दूरदृष्टीच्या भूमिकेची आठवण करून देण्यात येत होती.

Balasaheb Thorat, Rohit Pawar, Radhakrishna Vikhe Patil
Devendra Fadnavis Vs Ajit Pawar: सोलापूर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस-अजित पवार पुन्हा आमने-सामने ! काय आहे कारण ?

नगर जिल्ह्यातील परंपरागत राजकीय विरोधक बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या 'चांद्रयान 3'च्या यशस्वी मोहिमेनंतर मोदी की नेहरू अशी श्रेयवादाची चढाई दिसून आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी, "चंद्रयान मोहीम सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रो या संस्थेची स्थापना केली. इंदिरा गांधींनी अंतरात अंतराळवीर पाठविले. कॅप्टन राकेश शर्मा यांच्याशी झालेला त्यांचा संवाद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे. राजीव गांधी यांनीही या संस्थेला दिशा देण्याचे काम केले. नरसिंहराव यांच्या काळातही या संस्थेने आपली यशस्वी वाटचाल सुरूच ठेवली. आजच्या यशाची पायाभरणी ही केलेल्या या नेतृत्वाचे व संशोधकांचे आजच्या यशात मोठे योगदान आहे", असेही थोरांतांनी सांगितले.

चांद्रयानवर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी, "चांद्रयान मोहीमेचे यश हे 'इस्‍त्रो'च्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या कर्तबगारीचा मोठा अविष्‍कार आहे. विश्‍वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली आत्मनिर्भर भारताने महासत्तेचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले", असे सांगितले. सप्टेंबर २०१९ चांद्रयान मोहिमेत अपयश आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्‍त्रोच्‍या शास्त्रज्ञांच्‍या 'टिम'ला पुन्हा पाठबळ दिले. त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्व शास्त्रज्ञांच्या सामूहिक प्रयत्नामुळे देशाची मान पुन्हा एकदा उंचावली, असेही विखेंनी नमूद केले.

Balasaheb Thorat, Rohit Pawar, Radhakrishna Vikhe Patil
Shivsena MLA Disqualification Case : शिंदे गटाच्या उत्तरानंतर 16 आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग

दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवारांसह आमदार रोहित पवारांनी या मोहिमेच्या यशामागे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची दूरदृष्टी असल्याचा दावा केली. परिणामी चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेत नगरमध्ये मोदी की नेहरू अशी श्रेयवादासाठी मोठी उड्डाणे नेत्यांनी घेतल्याची दिसून आली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com