Uddhav Thackeray, Shrimant Shahu Maharaj Chhatrapati  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे उद्या घेणार शाहू महाराज छत्रपतींची भेट!

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून संघटित काँग्रेस पक्षाकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे.

त्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची माहिती आहे. दुपारच्या सत्रात भेट झाल्यानंतर सांगली येथे होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत.

खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनीदेखील या माहितीला दुजोरा दिला आहे. उद्या आम्ही कोल्हापूरला आहोत. आम्ही छत्रपती शाहू महाराजांना भेटणार आहोत, त्यांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ते आमच्या सोबत असतील, असेही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर दुपारच्या सत्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर नवीन राजवाडा येथे जाऊन शाहू महाराज यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या loksabha Election 2024 निमित्ताने चर्चा करणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर लोकसभा kolhapur loksabha constituency मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. मात्र, ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याने आणि काँग्रेस Congress आमदारांची संख्याबळ अधिक असल्याने ही जागा काँग्रेसकडे गेली आहे. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती Shrimant Shahu Maharaj Chhatrapti यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT