Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात तिरंगी लढतीचे संकेत; चेतन नरके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार...

Lok Sabha Election Kolhapur Constituency : कोल्हापुरात कंडता पडणार? लोकसभा तिरंगी होणार...
Kolhapur Lok Sabha Election
Kolhapur Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महाविकास आघाडीमधील काही घटक पक्षांच्या नेत्यांचा शब्द घेऊन गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची गेल्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सुटला असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता नरकेही या निवडणुकाच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

निवडणुकीची लगबग थांबवलेले डॉ. चेतन नरके हे पुन्हा एकदा आपल्या प्रचार वजा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. शुक्रवारपासून त्यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षाची वाट न पाहता तयारीला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. खात्रीलायक सूत्रांनी याबाबतची माहिती 'सरकारनामा'ला दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा निवडणूक हे तिरंगी होण्याचे संकेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत चर्चा केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन वेळा चेतन नरके यांनी हजेरी लावली होती. आतापर्यंत त्यांनी लोकसभा मतदारसंघातील 1255 गावांचा दोन वेळा दौरा केला आहे. त्याचबरोबर मतदारसंघात फलक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ठेवली होती.

Kolhapur Lok Sabha Election
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला होता. मात्र या मतदारसंघात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ जास्त असल्याने त्यावर काँग्रेसनेही दावा कायम केला होता. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी डॉ. नरके यांनी विशेष प्रयत्न केले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात चेतन नरके हे ठाकरे गटाच्या स्टेजवर होते. शिवाय खासदार अनिल देसाई, युवा सेनेचे वरुण सरदेसाई आणि संजय राऊत यांनी देखील नरके यांची घरी भेट घेतली होती. मात्र जागा वाटपात ही जागा काँग्रेसला गेली. काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते.

अपक्ष लढण्याच्या भूमिकेत?

जागा वाटपात कोल्हापूरची जागा काँग्रेसला गेली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून चेतन नरके या मतदारसंघात तयारी करत आहेत. दोन वेळा हा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आपण ऐनवेळी माघार का घ्यावी? असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एक सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार असल्याने शिक्षित तरुणात नरके यांची क्रेझ आहे. अशातच नरके यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असा दबाव कार्यकर्त्यांकडून होत आहे. महाविकास आघाडी कडून उमेदवारी निश्चित नसली तरी अपक्ष लढण्याची तयारी डॉ. नरके यांची सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून ते दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती सूत्राने 'सरकारनामा'ला दिली आहे.

हातकणंगलेच्या जागेवर नरकेंचा विचार?

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर (Lok Sabha) ठाकरे गटाने दावा केला होता. मात्र कोल्हापूर हा काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्याबदल्यात सांगली लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला गेल्याचे सांगितले जाते. ठाकरे गटाकडे असणारा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडण्याचा विचार आहे. मात्र राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत येण्यास नकार दिला आहे. ठाकरे गटाने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका शेट्टी यांची आहे.

Kolhapur Lok Sabha Election
Raj Thackeray Alliance BJP: राज ठाकरे सोबत डीलसाठी फडणवीस का नाहीत? विनोद तावडेंसोबत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना

राजू शेट्टी (Raju Shetti) यांची भूमिका ठाम राहिल्यास हातकलंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, माजी आमदार सुजित मिनचेकर यांच्या नावासोबत डॉ. चेतन नरके यांच्या नावावर चाचपणी झाल्याचे सांगितले जाते. नरके हे पन्हाळा तालुक्यातील असल्याने पन्हाळा तालुका आणि शाहूवाडी तालुक्यात नरके कुटुंबियांना मानणारा वर्ग आहे. मात्र तयारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात केल्याने हातकणंगले च्या जागेवर नरके विचार करतील, ही शक्यता फारच कमी आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com