Transfers of Revenue Officers  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या; सातारा, कराड, माण-खटावचे प्रांत बदलले

Transfers of Revenue Officers राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : जिल्ह्यातील महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये सातारा, कराड, माण-खटावचे उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलावडे यांची बदली झाली आहे. कराडच्या Karad उपविभागीय महसूल अधिकारीपदी अतुल म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा Satara व माण-खटावला अद्याप नवीन नियुक्ती दिलेला नाही.

राज्य शासनाने महसूल विभागातील विविध उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश नुकताच जारी केला आहे. सातारा जिल्ह्यातील चार महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये तीन प्रांताधिकारी व पुनर्वसन अधिकारी यांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रांताधिकारी उत्तम दिघे व सातारचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांचा समावेश आहे. उत्तम दिघे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सावनेर नागपूर येथील उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सांगली जिल्ह्यातील मिरज येथील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

साताराच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलावडे यांची सहाय्यक आयुक्त (मावक) पुणे पदी, तर सातारचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांची उपविभागीय अधिकारी दौंड पुरंदर येथे बदली झाली आहे. माण, खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांचीही बदली झाली आहे. सातारा व माण, खटावला अद्याप नवीन अधिकारी नियुक्ती केलेला नाही.

सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूरचे संतोष कुमार देशमुख, उप जिल्हाधिकारी पुणे गीतांजली शिर्के यांची नागरी समूह याच पदावर एक वर्षासाठी नियुक्ती झाली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या नवीन बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT