Shambhuraj Desai's Vedio : विधानसभेतील त्या पुडीबाबत शंभूराज देसाई बोलले : ‘मी तंबाखू खात नाही...मी चूक केली नाही...’

देसाईंनी ते देताच गोगावले यांनी पुडातील तो पदार्थ हातावर मळून खाल्ला आणि त्यानंतर ती पुडी देसाईंकडे सुपूर्त केली.
Shambhuraj Desai-Bharat Gogawale
Shambhuraj Desai-Bharat GogawaleSarkarnama

मुंबई : विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांच्यामधील हालचाली सभागृहातील कॅमेऱ्याने टिपल्या आहेत. गोगावलेंनी देसाई यांच्याकडे खुणेच काहीतरी मागितले. देसाईंनी ते देताच गोगावले यांनी पुडातील तो पदार्थ हातावर मळून खाल्ला आणि त्यानंतर ती पुडी देसाईंकडे सुपूर्त केली. (Shambhuraj Desai's explanation about that puddi in the assembly)

दरम्यान, यासंदर्भात मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुळात मी आणि भरत गोगावलेही तंबाखू खात नाही. त्यामुळे मी चूक केलेली नाही, असे शंभूराज यांनी स्पष्ट केले.

Shambhuraj Desai-Bharat Gogawale
Indapur NCP News : इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले भाजपचे चंद्रकांत पाटील!

अंतिम आठवडा प्रस्तावावर आज विधानसभेत चर्चा सुरू होती. त्यात चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभाग झाले होते. मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना त्यांच्या पाठीमागे सुरू असलेल्या हालचाली विधानसभेतील कॅमेऱ्याने अचूकपणे टिपल्या आहेत. त्यात आमदार भरत गोगावले यांनी खुणनेच मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे कशाची तरी मागणी केली. देसाई यांनी खिशातून काढून ती पुडी गोगावले यांना दिली. त्यातील पदार्थ गोगावले यांनी हातात घेऊन तो मळला आणि तोंडात टाकला. त्यानंतर ती पुडी गोगावले यांनी देसाई यांना परत केली.

हे सर्व सभागृहातील कॅमेऱ्याने अचूकपणे टिपले. त्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. त्याबाबत शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, या संदर्भात मी काही वाहिन्यांवर बातमी पाहिली, आमचे सहकारी आमदार भरत गोगावले यांनी काही मागितलं आणि मी ते दिलं

Shambhuraj Desai-Bharat Gogawale
Karmala Politics : करमाळ्याच्या पुढाऱ्यांना ‘आदिनाथ’ची गोडी सुटेना अन्‌ आमदारकीचे स्वप्नही स्वस्थ बसू देईना!

मूळात मी तंबाखू खात नाही, ना भरतशेठ खातात... माझाकडे मसाला इलायची होती. जी मी घसा कोरडा होतो; म्हणून खातो. ती भरतशेठ यांनी मागितली आणि मी दिली. मी सभागृहात गेली अनेक वर्ष बसतो. सभागृहाचे नियमही मला माहीत आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.

Shambhuraj Desai-Bharat Gogawale
Shiv Sena News : शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा सोडाव्याच लागतील : गजानन कीर्तीकरांनी भाजपला सुनावले

ते म्हणाले की, सभागृहातील व्हिडिओबद्दल युवा नेते बोलले. पण, तेच युवा नेते शेतकऱ्यांबद्दल बोलले का? शेतकऱ्यांच्या बांधावर गेले का? माझाबद्दल जी क्लिप चालली आहे. त्याबद्दल खातर जमा करायला हवी होती. ती बातमी चालवण्यापूर्वी विचारायला हवी होती. मी चूक केलेली नाही. मी तंबाखू खात नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com