Pune News : शनिशिंगणापूर देवस्थानाने काही दिवसांपूर्वी 168 कर्मचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक 114 हे मुस्लिम कर्मचारी आहेत. यावरून आता राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही राजकीय लोकांचा दबावामुळे देवस्थानाने या मुस्लिम कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर घेण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या, शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने आधी लिंगभेद केला होता. त्या विरोधात आम्हाला आंदोलन कराव लागले. स्त्री आणि पुरुष दोघांना देखील समान अधिकार असल्याने या दोघांनाही शनिशिंगणापूर देवस्थानाच्या चौथर्यावर पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि ते आंदोलन यशस्वी झाले.
त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थानाने आधी लिंगभेद केला आणि आता धर्मभेद करत आहे. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू धर्माच्या देवस्थानांमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांनी साफसफाई करणं चुकीचं असल्याचं सांगत या कर्मचाऱ्यांना हटवण्याची मागणी केली होती. त्या मागणीला घाबरून विश्वस्त मंडळांनी 168 कर्मचारी कामावरून काढून टाकले असून त्यापैकी 114 कर्मचारी हे मुस्लिम होते.
या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांना कामावरून कमी करताना जे अनियमितता हे कारण दिलं आहे ते धादांत खोट आहे. जर मुस्लिम धर्मातील काही लोक शनिशिंगणापूर या ठिकाणी सेवा करत असतील तर यामध्ये काही वावग नाही. हिंदू मंदिरामध्ये जर मुस्लिम धर्मीय सेवा करत असेल तर हे खूप मोठं उदाहरण आहे. कारण हिंदू धर्म हा सर्वसमावेशक आहे. उद्या मुस्लिम दर्ग्यामध्ये हिंदू धर्माचे लोक घेतले जात नाहीत हे म्हणण्यापेक्षा आमच्या हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये सगळ्या धर्माच्या कर्मचाऱ्यांना संधी दिली जाते, अशा पद्धतीचा स्टॅन्ड घेणं गरजेचं असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या.
अजितदादा यांच्या पक्षाचे आमदार असलेले संग्राम जगताप हे संविधानात पदावर काम करत असताना देखील अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. अजितदादा वारंवार सांगतात की त्यांचा पक्ष फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे. असं असेल तर त्यांच्या पक्षांचा एक आमदार वारंवार व्हिडिओ टाकत आहे, धमक्या देत आहेत. वारंवार सांगतात की आम्ही मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकू आता शिर्डीत जाऊन सुद्धा हेच करू त्यामुळे अजित दादा यांनी संग्राम जगतापला आवर घालवा असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
अजित पवार यांचा पक्ष जी विचारसरणी सांगतो त्याचाच अपमान करण्याचे काम हे संग्राम जगताप करत आहे. कुठल्याही जाती धर्माचे कर्मचारी असतात त्यांना बेरोजगार करणे हे पूर्णपणे चुकीच आहे. यापेक्षा संग्राम जगताप यांनी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टमध्ये जे बनावट ॲप्स प्रकरण झालं आहे ते उचलून धरावे. यासंदर्भात देवस्थानची तक्रार मी धर्मादाय आयुक्तांकडे करणार असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये लक्ष घालण्याचे सांगून जे कर्मचारी काढून टाकले आहेत त्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. असं तृप्ती देसाई म्हणल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.