Ajit Pawar : 'वसंतदादा, विलासरावही साखर कारखान्याचे चेअरमन होते, मलाही ‘माळेगाव’चे चेअरमन व्हायचंय'

Malegaon Sugar Factory Election : मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असून राज्यात उच्चांकी ऊसदर दिला जाईल. राजकीय विरोध म्हणून विरोधक माझ्या हेतूबाबत शंका उपस्थित करतात. पण सभासदांनी विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नये.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 15 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत शनिवारी (ता. 14 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पाच वर्षे मीच माळेगाव साखर कारखान्याचा चेअरमन होणार,’ अशी जाहीर घोषणा केली होती. त्यावर आज (ता. 15 जून) अजितदादांनी सविस्तर बोलताना ‘वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते, तेही साखर कारखान्याचे चेअरमन होते. मीही आता उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे सभासदांच्या भल्यासाठी मलाही ‘माळेगाव’चे चेअरमन व्हायचे आहे,’ असे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चेअरमन होण्याच्या घोषणेमुळे नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, विरोधक अजित पवार यांच्या चेअरमन होण्याच्या घोषणेमुळे बारामती तालुक्याची काय प्रतिष्ठा ठेवली, असा सवाल करत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री होण्याचे सोडून कारखान्याचे डायरेक्टर आणि चेअरमन होण्याच्या घोषणा करत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. अजित पवार यांच्या घोषणेवर दोन्ही बाजूने चर्चा होत आहे.

बारामती तालुक्यातील चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिक खुलासा केला आहे. ते म्हणाले, स्व. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेही साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्याच पद्धतीने मी उपमुख्यमंत्री मलाही सभासदांचं भलं करण्यासाठी माळेगाव साखर कारखान्याचे (Malegaon Sugar Factory) चेअरमन व्हायचं आहे. मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असून राज्यात उच्चांकी ऊसदर दिला जाईल. राजकीय विरोध म्हणून विरोधक माझ्या हेतूबाबत शंका उपस्थित करतात. पण सभासदांनी विरोधकांच्या भूल थापांना बळी पडू नये.

Ajit Pawar
Solapur NCP SP : सोलापुरातील निष्ठावंत नेता शरद पवारांची साथ सोडणार; खासदार मोहिते पाटलांवर हल्ला चढवत घेतला निर्णय

उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना म्हणून माळेगावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात घेतले जाते. चेअरमन झाल्यानंतर ती परंपरा मी कायम जपणार आहे. मते मिळविण्यासाठी विरोधक कारखान्याची नाहक बदनामी करीत आहेत. माळेगावची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणूनच बॅंका कर्ज देतात. विरोधक मात्र कर्जाची भीती दाखवत आहेत. माझ्या ताब्यात कारखाना दिला तर तुमच्या मताचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
Baliram Sathe : मोहिते पाटलांवर हल्लाबोल केलेल्या बळीराम साठेंची पाऊले शिंदेसेनेच्या दिशेने; बैठकीनंतर राजू खरेंनी घेतली भेट

केंद्र आणि राज्य सरकारकडील कामे मार्गी लावण्याची धमक माझ्यामध्ये आहे. इतर पॅनेलच्या प्रमुखांमध्ये ही धमक आहे, असा सवाल करून अजित पवार म्हणाले, मी माळेगाव कारखान्याचा चेअरमन झाल्यानंतर मला काम सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कारखान्यातीलच नव्हे तर सरकारकडील कामेही मी मार्गी लावेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com