Trupti Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री विखेंच्या निकटवर्तीयाचा व्हिडिओ तृप्ती देसाईंनी बाहेरच काढला; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Radhakrishna Vikhe patil : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निकटवर्ती याच्याबाबत गंभी आरोप केले आहेत. तसेच त्याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केला आहे. यामुळे पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील देखील खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Pune News : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्ती असलेल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी उत्तरनगर येथील जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांचावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच तृप्ती देसाई यांनी, त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काही भाजपच्याच महिला अधिकारी यांनी या जिल्हाध्यक्षाविरोधात आपल्याकडे लेखी तक्रार दिल्याचा दावा देखील तृप्ती देसाई यांनी यावेळी केला आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हे पदाचे आमिष देऊन महिलांना धाब्यावर बोलवणे, बियर बारमध्ये बोलवणे, स्वतः दारू पिऊन महिलांना डान्स करायला लावणे अशाप्रकारचे कृत करत असतात. ते आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत आहेत, अशा लेखी तक्रार भूमाता ब्रिगेडच्या कार्यालयात आल्या आहेत. तर या तक्रारी काही भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या महिलांनी दिली आहे.

दिनकर यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्याची दहशत माजवून इतरांवर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी दाखल केले आहेत, अशी ही तक्रार महिलांनी आपल्याकडे दिल्याचा त्यांनी दावा केला आहे. तसेच भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळची ही व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या विरोधात जाहीरपणे कोणी बोलत नाही. आणि बोलल्यास ते एखाद्या गुन्ह्यात त्यांना अडकवतात, असाही गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

श्रीरामपूर येथे एका माजी मंत्र्यांच्या बंगल्यात दिनकर यांचे वास्तव्य असून तिथे अनेक गैरप्रकार चालतात असे महिलांनी सांगितले आहे. महिलांनी याबाबतचा जून महिन्यातील श्रीरामपूर जवळील ढाब्यामधील दारू पिऊन मित्रांबरोबर डान्स करताना तसेच पदासाठी बोलावलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनाही जबरदस्ती डान्स करायला लावत असल्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे त्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.

अहिल्यानगर येथील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष महिलांबाबतीत असे चुकीचे कृत्य प्रकार करत असतील तर त्याला आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी तातडीने नितीन दिनकर यांचा राजीनामा घेऊन त्यांचे पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे मेलद्वारे केली आहे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष, राम शिंदे यांनाही सदर तक्रार मेलद्वारे केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून याची पूर्णपणे माहिती घ्यावी असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT