Tukaram Mundhe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tukaram Mundhe Statement : “...तर ती फक्त शोभेची वस्तू ठरेल!” तुकाराम मुंढेंनी नेमके कोणाचे कान टोचले?

Tukaram Mundhe speech in Wai : वाई येथे आयोजित 110 व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमात तुकाराम मुंढेंनी समाज, नैतिकता आणि जबाबदारी यावर स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्याची राज्यभर चर्चा रंगली आहे.

Rashmi Mane

“नैतिकता ही फक्त भाषणांपुरती मर्यादित राहिली, तर ती शोभेची वस्तू ठरेल,” अशा शब्दांत अधिकारी तुकाराम मुंढे यांनी समाजातील ढासळत्या मूल्यांवर जोरदार भाष्य केले. वाई येथे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 110 व्या वर्षाच्या समारोप कार्यक्रमात ‘समाज आणि नैतिकता : आजची वास्तवता’ या विषयावर बोलताना त्यांनी परखड मत मांडले.

या कार्यक्रमात बोलताना मुंढे म्हणाले सरकार, अधिकारी, नागरिक आणि कंत्राटदार असे सर्वच जण जबाबदारी टाळताना दिसत आहेत. त्यामुळे समाजातील नैतिक मूल्यांची घसरण होत आहे.

दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा “ही जबाबदारी माझीही आहे” असे म्हणणारे लोक कमी होत चालल्याचे आहेत. नैतिकतेचे उदाहरण देताना त्यांनी प्रा. शिवाजीराव भोसले यांचा उल्लेख करत. 'मुख्यमंत्री नातेवाईक असल्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार नाकारला होता. अशी कृती म्हणजे खरी नैतिकता असल्याचे मुंढे म्हणाले. आज मात्र प्रामाणिक वागणाऱ्या व्यक्तीलाच वेगळ्या नजरेने पाहिले जाते, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

अपघात घडल्यावर मदत करण्याऐवजी लोक मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात व्यस्त असतात, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. समाज योग्य दिशेने चालला आहे का, याचा विचार न करता लोक प्रवाहाबरोबर वाहत असल्याचे ते म्हणाले. “माणूस म्हणून जगा, केवळ गर्दीचा भाग बनू नका,” असा संदेश त्यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाचे उदाहरण दिले. हिंदवी स्वराज्य म्हणजे समानता आणि नैतिकतेवर उभे असलेले राज्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनातील अनुभव सांगताना मुंढे म्हणाले, कोणताही निर्णय घेताना तो कायदेशीर, नैतिक आणि सर्वांसाठी हितकारक आहे का, हे तीन प्रश्न मी स्वतःला विचारतो. समाजात प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारली, तर भारताला महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT