Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा शिवसेनेच्या नगरसेवकांना सल्ला; म्हणाले, "भाजप नगरसेवकांचा कोंडमारा होतोय, त्यांच्याकडून..."

Aditya Thackeray Attack's On BJP : 'नाशिक शहरातील नागरिकांची कोंडी भाजपने केली आहे. पावसाळा तोंडावर आहे. मात्र शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या अडचणी भाजपला दिसत नाहीत का? जनतेत या कारभाराविरोधात प्रचंड रोष आहे.'
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 25 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज भाजपच्या मर्मावर बोट ठेवले. भाजपच्या कारभारामुळे त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांचा कोंडमारा होतो आहे. त्यामुळे शिवसेनेने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

सत्ताधारी म्हणून कामकाज करताना अनेक मर्यादा येतात. सध्या भाजपच्या नगरसेवकांची ही त्यांच्याच पक्षाच्या कारभाराने कोंडी होत आहे. त्यामुळे भाजपचेच नगरसेवक विरोधकांना अनेक मुद्दे पुरवतात. हे मुद्दे भाजप म्हणून त्यांना मांडता येत नाही, असे ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी भाजपच्या मर्मावर बोट ठेवत टीका केली. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला कोणाचा विरोध नाही. परंतु ही कामे करताना कोणत्या राज्यातील कंत्राटदारांना देण्यात आली आहेत, हे पाहिले पाहिजे त्याचा नाशिक शहराला आणि शहरातील नागरिकांना काही फायदा होत आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

नाशिक शहरातील नागरिकांची कोंडी भाजपने केली आहे. पावसाळा तोंडावर आहे. मात्र शहरातील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या अडचणी भाजपला दिसत नाहीत का? जनतेत या कारभाराविरोधात प्रचंड रोष आहे.

Aditya Thackeray
Ambenali Ghat Accident : रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून सातारच्या 8 जणांचा जागीच मृत्यू, मृतांची नावे आली समोर

शहरात सत्ता तुमची आहे. चांगली कामे केली तर विरोध कोणाचा असेल? असंही ठाकरे यावेळी म्हणाले. तर भाजपने काय कामे करायची याबाबत कोणाशी तरी चर्चा केली आहे का? शेतकरी आणि कामगारांचे प्रचंड नुकसान या पक्षाने केले आहे. राज्यभर हीच स्थिती आहे.

आमदार संजय गायकवाडांचा शेलक्या शब्दात ठाकरे यांनी समाचार घेतला. "शिवाजी कोण होता" आणि "दगलबाज शिवाजी" यावर गायकवाड विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार आहेत. ही पुस्तके गायकवाड यांनी वाचली असती तर शिवरायांनी दगलबाजांना काय शिक्षा दिली हे त्यांना कळले असते, असा टोमणा ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray
NCP Politics : मोहिते, थोरात, शिवतारे, लांडे आमदारकीसाठी रांगेत! 'राष्ट्रवादी'मध्ये शहर-ग्रामीण वाद पेटला; सुनेत्रा पवारांची पसंती कोणाला?

आमदार गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडून पळताना चार वेळा विचार केला असता. वेळ गेलेली नाही, त्यांनी देशात काय चालले आहे? बेरोजगारी किती वाढली आहे? रुपयाची स्थिती काय आहे? तरुण, तरुणी रोजगारासाठी कसे वणवण भटकत आहे हे समजून घ्यावे. या परिस्थितीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांनी बोलावे, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com