Manoj Jarange Patil, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजे घेणार जरांगे पाटलांची भेट; आज अंतरवाली सराटीला जाणार

Maratha Reservation : शिंदे समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक मुंंबईत होत असून, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

Umesh Bambare-Patil

Satara Udayanraje Bhosale news : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची परिस्थिती नाजूक झाली असून, शासनाकडून अद्यापही आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आज दुपारी निघणार आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या भेटीनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची उत्सुकता ताणली आहे.

मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मनोज जरांगे पाटलांच्या Manoj Jarange Patil सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलने सुरूआहेत. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून, त्यांनी पाणीसुद्धा घेणे टाळले आहे. तसेच त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.

दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून, बीड जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, तर कराड तालुक्यात सकल मराठा समाजाने विराट मोर्चा काढून आपली ताकत दाखवली आहे,तर गावागावांत नेत्यांना गावबंदीचा निर्णय होत असून, जिल्ह्यातील १५० गावांनी गावबंदींचा निर्णय घेतला आहे.

शिंदे समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक मुंंबईत होत असून, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटलांची तब्येत पूर्णपणे खालावली असून, त्यांच्यावर तातडीने उपाचाराची गरज आहे. maharashtra political news

पण, आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणतेही उपचार घेण्यास जरांगे पाटलांनी नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आज जाणार आहे. दुपारी ते साताऱ्यातून निघणार आहेत. त्यामुळे ते जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची उत्सुकता ताणली आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT