Shivendra Raje Bhosale Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : यापुढे जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार; उदयनराजेंचा इशारा नेमका कोणाला...?

Bjp Political News : महायुती व महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. त्यातच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला.

Umesh Bambare-Patil

Satara News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असला तरी सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर करण्यात येत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती व महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. त्यातच आता खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. (Udayanraje Bhosale News)

यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार आहोत. कोणीही शड्डू ठोकले तरी महेश शिंदे, शिवेंद्रसिंहराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासाठी देव आहेत, असा भावनिक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेत्यांना दिला.

खासदार उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात आभार दौरा सुरू केला आहे. त्यानुसार पहिला मेळावा कोरेगाव येथे झाला.यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके शैलीत भाषण करताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना सणसणीत इशारा दिला आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, यापुढे जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रसिंहराजेच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच येत्या काळात कोणी कितीही शड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी माझा देव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhosle), महेश शिंदे, मनोज घोरपडे,अतुल भोसले हे आहेत, असे त्यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT