MVA Seat Sharing Update : कोण मोठा भाऊ नाही, कोण छोटा! विधानसभेसाठी 'असा' असणार 'मविआ' चा जागावाटप फॉर्म्युला?

Assembly Election 2024 News : मविआतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्ष लवकरात लवकर जागावाटपाचा प्रश्न निकाली लावण्याच्या तयारीत आहे.
nana patole uddhav thackeray sharad pawar
nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama

Mumbai News : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला. तर दारुण पराभवामुळे महायुती बॅकफूटवर गेली आहे. लोकसभेतील यशामुळे मविआचा कॉन्फिडन्स वाढला आहे तर महायुतीला हेवेदावे- आरोप-प्रत्यारोपांनी खटके उडत आहे.याचवेळी आता जागावाटपावरुन मविआच्या गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीसाठी अवघे तीन ते चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाच आघाडीने जागावाटपाचा मुद्दा मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीची मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानंतर मविआच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) 96-96-96 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.मविआतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे गट या तीनही पक्ष लवकरात लवकर जागावाटपाचा प्रश्न निकाली लावण्याच्या तयारीत आहे. लोकसभेला उमेदवारी उशिरा मिळाल्याचा फटका अनेकांना बसल्याचे दिसून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर शिवसेना ठाकरे गट मुंबई, कोकण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांवर दावा ठोकणार असल्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येत आहे.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Abdul Sattar On Manoj Jarange : 'मनोज जरांगे हे मराठा समाजाचे आयकॉन, निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार' ; सत्तारांचं विधान!

लोकसभा निवडणुकीत कमीत कमी जागा पदरात पडूनही सर्वात चांगली कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने करुन दाखवली आहे. त्यांनी महाविकास आघाडीत 10 जागांपैकी तब्बल 8 जागा निवडून आणल्या होत्या.तर काँग्रेसने 17 पैकी 13 आणि शिवसेना ठाकरे गटाने 21 पैकी 9 जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभेला जागावाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस अधिक जागांवर दावा करु शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेत स्ट्राईक रेटचा संदर्भ देत 100 जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. लवकरच महाविकास आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि ते लढवू इच्छित असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाबाबत बोलणी होण्याची शक्यता आहे.

nana patole uddhav thackeray sharad pawar
Bachchu Kadu On Devendra Fadnavis : पंकजाताईंसाठी फडणवीसांच्या कार्यवाहीचं नवल नाही; बच्चू कडू असं का म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com