Sangola MVA vs Mahayuti News : सांगोला विधानसभेसाठी महायुतीमध्ये 'आबा' की 'बापू'; शेकापमध्ये दोन बंधूमध्येच रस्सीखेच

Political News : सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukh
Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukhSarkarnama

दत्तात्रय खंडागळे

Solapur News : लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसला असतानाच आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने कार्यकर्त्यात नाराजी दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुती व महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे.

सांगोला तालुक्यात इच्छुक नेतेमंडळी लोकसभेला झालेल्या मतांची गोळा बेरीज, आकडेमोड करीत विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. महायुतीतील शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह विधानसभेला यावेळी फिक्सच असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील कामाला लागले आहेत तर महाविकास आघाडीतील (MVA) शेतकरी कामगार पक्षातीलच डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख या बंधूमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच सुरु आहे.

सध्या प्रमुख नेतेमंडळी व कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या नेत्यांच्या फोटोसह 'भावी आमदार' अशा पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध करीत असल्याचे चित्र दिसून येते. राज्यात लोकसभेच्या निकालावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती व महाविकास आघाडीमधील सांगोला तालुक्यातील नेतेमंडळी विधानसभेच्या तयारी करू लागले आहेत.

गेल्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दीपक साळुंखे पाटील यांनी सहकार्य केले होते. राज्यातील पक्षीय आघाडी बाजूला सारून आबा-बापू एकत्र आले होते. या निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला असलेला तालुक्यात शिवसेनेचा धनुष्यबाणाने इतिहास घडविला होता. सध्या राजकीय परिस्थितीही वेगळी आहे.

Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukh
Video Ramesh Kuthe News : गोंदियात भाजपला मोठा झटका; माजी आमदार रमेश कुथे यांचा राजीनामा....

विद्यमान आमदार शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हेही यावेळी निवडणूक लढवणारच यासाठी कामाला लागल्याचे दिसून येते. यामुळे महायुतीमधील 'आबा' की 'बापू' यांची चर्चा सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्षांमध्येही सर्व काही अलबेल आहे असे नाही. गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासह त्यांचे चुलत बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपले राहिलेले अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाहेर गेलेल्या कालावधीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शेकाप पक्षामध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली आहे.

यामुळे शेकापमध्ये उमेदवारीसाठी दोन डॉक्टर चुलत बंधूंमध्ये रस्सीखेच असणार आहे. राज्यातील युती व आघाडी कोणत्या पक्षांमध्ये कशी होते, यावरच येतील घटक पक्षाची व उमेदवारीची निश्चित होईल, असे चित्र दिसून येते.

Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukh
Praniti Shinde News : प्रणिती शिंदेंचा 'हौसला सातवें आसमान पर', म्हणून काय ज्येष्ठांचा अवमान करायचा का ?

निवडणूक लढविण्यावर ठाम

गेल्यावेळी विधानसभेसाठा शेकाप पक्षाकडून निवडणूक लढविणारे डॉ. अनिकेत देशमुख याही वेळी निवडणूक लढविणारच यासाठी तयारी करीत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही आमदार शहाजी बापूंच्या विरोधात किंवा बापूंच्या पाठिंब्याने निवडणूक मात्र निश्चितपणे लढवणार अशा पोस्ट प्रसिद्ध केल्याने या पोस्ट विषयी वेगवेगळ्या चर्चा मात्र रंगू लागली आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांना आमदार शहाजी पाटील यांचा पाठिंबा नेमका कसा मिळणार ? याविषयी सर्वसामान्यांमधून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

'बापू' की 'आबा' चर्चा पुन्हा जोरात

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील (Dipak Salunkhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना सुद्धा ऐनवेळी आमदार शहाजी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. तालुक्यात दोन्ही गट एकत्र आल्यामुळे अल्पमतात का होईना आमदार पाटील यांचा विजयी झाले होते. त्यापुढील काळातही दोघा आजी-माजी आमदारांनी एकत्रित काम केल्याचे दिसून आले. परंतु, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र आमचे नेते निवडणूक लढविणारच यावर जोर देऊ लागले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीमधून कोणाला तिकीट मिळणार? गेल्या वेळेस आबांच्या साथीने बापूंनी निवडणूक लढवली, आता बापूंनी साथ देऊन आबांनी निवडणूक लढवावी, याविषयी चर्चा मात्र जोरदार सुरू झाल्या आहेत.

Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukh
Shivsena News : लोकसभेच्या पराभवानंतर संभाजीनगरात ठाकरे गटातून 'आउटगोइंग' सुरू !

प्रचाराची सुप्त चर्चा

गेल्या वेळेस लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे (Sanjaymama Shinde) यांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तालुक्यातून साडेचार हजार मताचे मताधिक्य मिळाले आहे. या मताधिक्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी मताधिक्यामध्ये कोणी आतून-बाहेरुन मदत केली याची चर्चा मात्र दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, लोकसभा व विधानसभेचे मैदान वेगळे असून राजकीय वातावरणही वेगळेच असते याची जाणीव प्रत्येक नेत्याला आहे.

Aniket deshmukh, Shahajibapu Patil, deepak salaunkhe, babasaheb deshmukh
Ambadas Danve : सगेसोयऱ्यासंदर्भात अध्यादेश काढणारे सरकारमधील मंत्रीच आरक्षण टिकणार नाही, असं सांगतात; दानवेंचा हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com