Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : गड-किल्ल्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना उदयनराजेंच्या कानपिचक्या; म्हणाले...

हेमंत पवार - Hemant Pawar

Satara News :  विशाळगडासंदर्भात काय घडले, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड-किल्ले आहेत, तेथे अतिक्रमण होता कामा नये, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त करुन अतिक्रमण करणाऱ्यांची कानउघडणी केली. 

कऱ्हाडमधील ( जि. सातारा) पाणी पुरवठ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार भोसले हे शनिवारी कऱ्हाडला आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) म्हणाले, विशाळगडासंदर्भात काय घडले, काय घडले नाही यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड-किल्ले आहेत तेथे अतिक्रमण होता कामा नये. (Udayanraje bhosale News)

वर्षानुवर्षे जे गडावर राहणारे गडकरी आहेत, त्यांची घरे सोडली तर कोणीही तेथे अतिक्रमण करु नये. उद्या गडावर जावुन कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल. त्यामुळे त्याचे पावित्र्य राहत नाही. गड-किल्ले हे सर्व पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतात. पुरातत्व खाते हे अवैध बांधकामाला परवानगी देणार असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

गडावर राहणारे जे गडकरी आहेत. ते सोडले तर बाकींच्यानी गडावर अतिक्रमण करण्याचा अधिकारच काय येतो ? त्यांनी तेथे अतिक्रमण करुच नये असे स्पष्ट करत खासदार उदयनराजे भोसले यांनी अतिक्रमण करणाऱ्यांची कानउघडणी केली.

दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. मात्र, आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT