MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजेंच्या संपत्तीत १५.६९ कोटींनी वाढ; २.४४ कोटी रुपयांचे कर्ज

सरकारनांमा ब्यूरो

Satara Loksabha News : उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे 16 कोटी 85 लाख 77हजार 048 ची जंगम, तर 24 कोटी 25 लाख 29 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एक कोटी 90 लाख 05 हजारांच्या सहा आलिशान गाड्या असून, 36 किलो सोने आहे. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती एक अब्ज 57 कोटी, 25 लाख रुपये होती. गेल्या पाच वर्षांत उदयनराजेंच्या संपत्तीत १५ कोटी ६९ लाख ४९ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे एकूण एक अब्ज 72 कोटी, 94 लाख 49 हजार रुपयांची संपत्ती आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी 2022- 23 मध्ये एक कोटी 11 लाख 50 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले आहे. पत्नी दमयंतीराजे यांनी 20 लाख 67 हजार 724 रुपयांचे करप्राप्त उत्पन्न, तर हिंदू अविभक्त कुटुंब 30 लाख 07 हजार रुपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे. उदयनराजेंकडे 5 लाख, 85 हजार 715 रुपये, तर पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्याकडे एक लाख 35 हजार 980 रुपये, तर अविभक्त कुटुंब म्हणून तीन लाख 68 हजार 900रुपयांची रोकड आहे.

विविध बॅंकांमध्ये उदयनराजेंच्या 2 कोटी 63 लाख 63 हजार 318 रुपयांची रक्कम शिल्लक आहे. विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये उदयनराजेंच्या नावे 99 लाख 74 हजार रुपये गुंतविलेले आहेत, तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे बिटकॉनमध्ये चार लाखांची गुंतवणूक आहे. विविध संस्था, कंपनी व भागीदारी संस्थांना दिलेल्या रकमा आठ कोटी 16 लाख 54 हजार रुपयांच्या आहेत.

खासदार उदयनराजेंकडे 1 कोटी 90 लाख 05 हजारांच्या सहा आलिशान गाड्या आहेत. यात ऑडी, मर्सिडिज बेन्ज, फॉर्च्युनर, मारुती जिप्सी, दोन ट्रक्टर व एस क्रॉस गाडीचा समावेश आहे. तर पत्नी दमयंतीराजेंच्या नावे पोलो ही चार लाखांची गाडी आहे. उदयनराजेंवर 2 कोटी 44 लाख 63 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज आहे.

खासदार उदयनराजेंकडे 2 कोटी 60 लाख 74 हजारांचे 36 किलो सोने आहे, तर पत्नी दमयंतीराजेंकडे 35 लाख 64 हजारांचे विविध दागिने आहेत, तर हिंदू अविभक्त कुटुंबाकडे 44 लाख 35 हजारांचे दागिने आहेत. उदयनराजेंकडे एक अब्ज, 27 कोटी, 99 लाख 30 हजार रुपये किमतीची शेतजमीन असून, 20 कोटी 14 लाखांची बिगरशेती जमीन आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच 29 लाख 01 हजारांच्या वाणिज्य इमारती, तसेच 19 कोटी 93 लाख 12 हजारांची निवासी इमारती अशी एकूण त्यांच्याकडे एक अब्ज 72 कोटी, 94 लाख 49 हजारांची संपत्ती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती एक अब्ज 57 कोटी, 25 लाख रुपये होती. मागील पाच वर्षांत त्यांची संपत्तीत १५ कोटी ६९ लाख ४९ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT