Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale on Lok Sabha Result : मला नागरिकांनी पडायला पाहिजे होतं; उदयनराजे असे का म्हणाले, जाणून घ्या...

सरकारनामा ब्यूरो

हेमंत पवार

Karad Newsः महायुती कशात कमी पडली, अपेक्षित यश मिळाल नाही. खरंतर मलाही पाडायला पाहिजे होते. जे नागरिक तुमच्यासाठी झटतात, झगडतात याचं मोजमाप होणार आहे की नाही ? मोजमाप झालं पाहिजे. पाडा, खाल्लास करा, मारून टाका, जे लोक तुमच्यासाठी झटले त्यांना तुम्ही पाडणार आणि एवढं वर्ष तुम्ही ज्यांना बरोबर मतदान केलं त्यांनी काय केलं ? अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी खेद व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांचे शनिवारी कऱ्हाड शहरात जल्लोषात स्वागत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही यावर उदयनराजे भोसले म्हणाले, पाडा, खल्लास करा, मारून टाका, असे म्हणत राग व्यक्त केला. महायुती कशात कमी पडली, अपेक्षित यश मिळाल नाही. खरंतर मलाही पाडायला पाहिजे होते.

जे लोक तुमच्यासाठी झटतात, झगडतात याचं मोजमाप होणार आहे की नाही. तेव्हा मोजमाप झालं पाहिजे. जे लोक तुमच्यासाठी झटले त्यांना तुम्ही पाडलं. एवढं वर्ष तुम्ही ज्यांना भरभरून मतदान केलं त्यांनी काय केलं, असाही सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

सध्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो सोडवावा, असे कॉंग्रेसची (Congress) सत्ता असतानाही कोणालाही वाटले नाही. लोक मतदान करतात त्यामुळे सत्ता मिळते. मी कृष्णा खोरे विकासाची संकल्पना मी मांडली. त्याला गोपीनाथ मुंडे यांनी साथ देवुन त्याचे महामंडळ स्थापन केले. त्यामुळे धरणांची कामे झाली. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना दिलासा मिळाला असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझे सर्व मित्र देव आहेत

देवापेक्षा कोणी मोठं नसते. निकाल काही जरी लागला असता तरी जे लोक माझ्यासाठी झटतात, जे माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे मी आहे. देव एक उपमा असती. माझे जेवढे मित्रमंडळी आहेत ते माझ्यासाठी देव आहेत.

लोकांच्या माध्यमातून आम्ही दोघच नाही तर सर्वजण मिळून आम्हाला जेवढे काम करता येईल, तेवढे काम आम्ही करणार आहोत. कोण काय करते यापेक्षा आम्ही कार्यरत राहणार असून लोकांच्या मुलभुत समस्या दूर करण्याचे काम सरकार करत आहे. विकास कामाच्या माध्यमातून भविष्यात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार निवडून येतील, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT