Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे, तुम्ही लोळत जावा किंवा चालत; पण सातारा पालिकेला लोळवू नका....

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या विषयावरून आठवडाभरापासून जी काही उद्‌घाटने, पोस्टरबाजी चालली होती. दुचाकीवरून उद्‌घाटनाला जाण्यावरून मी माझे मत व्यक्त केले होते. ही सगळी शोभा नौटंकी आहे, या मतावर मी आजही ठाम आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो

सातारा : खासदार साहेबांना एकीकडे पेट्रोल परवडत नाही म्हणत असताना एक कोटींची नवीन बीएमडब्ल्यू घेतल्याचे सोशल मीडियावरून दिसून आले. हे त्यांचे सुत्रच कळेना झालंय. ही नवी बीएमडब्ल्यू कशावर चालविणार असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी चालत जायचं की लोळत जायचे हे त्यांचे त्यांनी ठरवावे. पण सातारा पालिकेला लोळवण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी प्रतापगडावरून आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर टीकेची तोफ डागली होती. त्या तोफेला त्यांच्याच स्टाईलने आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रतिउत्तर दिले आहे. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पालिकेच्या विषयावरून आठवडाभरापासून जे काही उद्‌घाटने, पोस्टरबाजी चालली होती. दुचाकीवरून उद्‌घाटनाला जाण्यावरून मी माझे मत व्यक्त केले होते. ही सगळी शोभा नौटंकी आहे, या मतावर मी आजही ठाम आहे.

खासदार साहेबांनी आज सांगितले की, मला पेट्रोल परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून गेलो. आम्हालाही ही बाब शॉकिंग आहे की, महाराजांना पेट्रोल परवडत नाही. तसेच ते म्हणाले की, त्याला कॉमनसेन्स लागतो. तो कॉमन नसतो. मला कॉमनसेन्स कमी असेल, असे त्यांचे म्हणणे असेल. पण पेट्रोल परवत नाही असे म्हणतानाच कालच त्यांच्या ताफ्यात एक कोटींची बीएमडब्ल्यू आल्याचे सोशल मीडियावर पहायला मिळाली. याचे सुत्रच कळेना झालं आहे. ही बीएमडब्ल्‍यू कशावर चालवणार तुम्हाला पेट्रोल परवडत नसेल तर, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे.

खासदार साहेबांनी चालत जायचे की लोळत जायचे, हे त्यांनी कसे करायचे तसे करा, पण नगरपालिकेला लोळवाण्याचा प्रयत्न करू नका. पाच वर्षे सातारकरांनी संधी दिली होती. पण पाच वर्षात कुठलेही उठावदार काम पालिकेत दिलेले नाही. कोविडच्या संकटात सातारा पालिकेने काहीही केलेले नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठी पालिका म्हणून सातारा पलिकेचे नाव आहे. जिल्ह्याचे ठिकाण असून पालिकेने कोविडमध्ये कोणतेही चांगले काम केलेले नाही, असा आरोप शिवेंद्रसिंहराजेंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT