साताऱ्याची हद्दवाढ अजित पवारांच्या सहकार्यानेच मार्गी : शिवेंद्रसिंहराजे

'आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट करू.'
Extension of Satara is due to Ajit Pawar : Shivendraraje
Extension of Satara is due to Ajit Pawar : Shivendraraje
Published on
Updated on

सातारा : हद्दवाढ झाली तरच त्रिशंकू भागाचा विकास होणार आहे. या दूरदृष्टीतून सातारा पालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट करू, असा शब्द सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. Extension of Satara is due to Ajit Pawar : Shivendraraje

साताऱ्याच्या हद्दवाढीत समाविष्ठ विसावा नाका येथील विसावा पार्कमधील अंतर्गत रस्त्यासाठी आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेतून १२ लाख ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला. या रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरणाचा प्रारंभ आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी शिवाजी ढाणे, विलास पवार, डॉ. दीपक निकम, ऍड. संजय भोसले, डॉ अमोल ढवळे, दत्ताजी भोसले, ओंकार तिखे, हरेश दोशी, यतीन दोशी, ईशान दोशी, राजन पोरे, संजय निकम सर, सावंत सर, प्रसाद कुलकर्णी, एस एन कुलकर्णी, रमेश जाधव, चंद्रकांत भोसले, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, रवि पवार, राजेंद्र राजे, ओमकार भंडारे आदी उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आमदार फंडासह शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून त्रिशंकू भागात सातत्याने विविध प्रकारची विकासकामे मार्गी लावली आहेत. त्रिशंकू भागात प्रत्येक कॉलनी, नगर, वसाहत येथील अंतर्गत रस्ते मार्गी लावले. पूर्वीपासूनच या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून या भागातील सर्व प्रकारच्या समस्या सातत्याने सोडवल्या आणि यापुढेही सोडवू. सातारा पालिका अथवा ग्रामपंचायत हद्दीत समाविष्ट नसल्याने त्रिशंकू भागातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी नेहमीच अडचणी यायच्या. 

मात्र, सर्वप्रकारच्या अडचणींवर मात करून त्रिशंकू भागासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि विविध प्रकारची विकासकामे सातत्याने मार्गी लावली. हद्दवाढ झाली तरच त्रिशंकू भागाचा विकास होणार आहे. या दूरदृष्टीतून सातारा पालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने मंजूर करून घेतला. आता त्रिशंकू भाग पालिका हद्दीत आल्याने या भागातील मूलभूत सुविधांसह सर्व प्रकारच्या समस्या सोडवू आणि खऱ्या अर्थाने या भागाचा कायापालट करू.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com