sanjay pawar | uddhav thackeray | ravikiran ingavale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Shivsena: कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; ज्या निवडणुकीत शिवसेना फुटली; 'त्या' नेत्याचा तडफाफडकी राजीनामा

Sanjay Pawar News : एकनाथ शिंदेंसह चाळीसहून अधिक आमदारांनी बंड करत 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेना फुटली होती. याच निवडणुकीत संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

Deepak Kulkarni

Kolhapur News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले.याचमुळे स्थानिक पातळीवर पदाधिकार्‍यांच्या नाराजीनं डोकं वर काढल्यामुळे राजकीय पक्षांसमोर पेच निर्माण होत आहे. अशातच आता कोल्हापुरातही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा भडका उडाला असून ज्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट पडली अन् संजय पवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच संजय पवारांनी (Sanjay Pawar) आता तडकाफडकी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

कोल्हापुरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून वादाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि रवीकिरण इंगवले यांच्यात खटके उडाले आहे. त्यांच्यातील वादाचे ऑडिओ कॉलही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. याचदरम्यान,त्यांनी आता पत्रकार परिषदेत राजीनामा देत असल्याची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची संजय पवारांनी उपनेतेपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. काहीवेळ पत्रकार परिषदेच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र,ही नियुक्ती करताना उपनेत्याला माहिती नसेल तर काय करायचे अशी संतप्त भावना संजय पवार यांनी बोलून दाखवली.

संजय पवार म्हणाले,जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेतून बाहेर ठेवलं, 36 वर्षे शिवसैनिक म्हणून काम केलं. मी हनुमान म्हणून आयुष्यभर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पायाजवळ कायम राहणार आहे. मी शिंदे गटात जाणार अशी अफवा पसरवण्यात आली. पण मी कुठंही जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच आपण 1990 पासून शिवसैनिक म्हणून पक्षात काम केलंय. गेली 36 वर्षे मी एकनिष्ठपणे काम केलं. मातोश्रीवरून जे आदेश येतील, त्याचे तंतोतंत पालन केलं. पण गेली 10 वर्षे बघितलं तर काही वेगळं घडत गेलं. निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी असल्याचं स्पष्ट मतही व्यक्त केलं.

याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत षडयंत्र लावण्यात आलं. मधुरिमाराजे यांनी अचानक का माघार घेतली? राजू लाटकर यांना उमेदवारी मिळाली, त्यासाठी देखील शिवसेना राबली. विधानसभेला मधुरिमाराजे यांनी माघार का घेतली हे भविष्यात समोर येणार असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला.

जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अनेक होते,पण नियुक्ती करताना उपनेत्याला देखील माहिती नसेल तर काय करायचं.त्यामुळे मी शिवसेना उपनेतेपदाचा मी राजीनामा देत आहे. एक शिवसैनिक म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याची ग्वाहीही यावेळी संजय पवार यांनी दिली.

एकनाथ शिंदेंसह चाळीसहून अधिक आमदारांनी बंड करत 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेना फुटली होती. याच निवडणुकीत संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. ही उमेदवारी थेट संभाजी राजे यांच्याविरोधात होती आणि तेव्हाच शिवसेना फुटली होती आणि या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण ही निवडणुक आणि संजय पवार राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT