Shivsena UBT : शिवसेनेत नाराजीचा स्फोट; आदित्य ठाकरेंकडून अवहेलना; हर्षल सुर्वेंचा उद्धव ठाकरेंना रामराम

Kolhapur Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी जिल्हाप्रमुखपद न मिळाल्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Shiv Sena UBT’s Kolhapur South leader Harshal Surve resigns
Shiv Sena UBT’s Kolhapur South leader Harshal Surve resignsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूरमध्ये जिल्हाप्रमुख नियुक्तीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा अखेर स्फोट झाला आहे. पक्षाचे दक्षिण विधानसभा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे व्हाट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवला आहे. ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

साहेब माझी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नाही. त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती. मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जीव्हारी लागली. आज पर्यंत आदेश माणूनच काम केले होते. कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला, निर्णय मान्य नसेल तर निघुन जावा. मला निर्णय मान्य नाही साहेब. साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदचा राजीनामा देत आहे, असे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

नुकतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली. तर शहर प्रमुख पदी हर्षल सुर्वे यांची निवड करण्यात आली होती. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हीच नियुक्ती कळीचा मुद्दा ठरली आणि पक्षात नाराजी नाट्यच सुरू झाले. इंगवले यांच्यासह हर्षल सुर्वे व उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांनी जिल्हाध्यपदासाठी फिल्डिंग लावली होती. पण इंगवले यांना पक्षश्रेष्ठींनी संधी देत त्यांना जिल्हाप्रमुख केले.

इंगवले यांच्या नियुक्तीवर सुर्वे यांनी तीव्र नाराजी दर्शवली. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला जिल्हाप्रमुख करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंगवले यांनी जवळच्या कार्यकर्त्याच्या आणि सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांना ज्यांनी जवळ केले ते त्यांच्यावरच उलटल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यांनी राजेश क्षीरसागर, संजय पवार, सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांना दगा दिला आहे. या नेत्यांसह इतरांनी नकारलेल्या नेत्याला आता आमच्या उरावर बसवलं जात असेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी नाराजी सुर्वे यांनी व्यक्त केली होती.

या नाराजीनंतर आदित्य ठाकरे यांनी सुर्वे यांचा समाचार घेतला. पक्षात वाद नसतो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे सांगतात तो आदेश असतो आणि तेच बरोबर असतं. ज्यांना आमच्यासोबत काम करायचं आहे. ते सोबत काम करतील ज्यांना करायचं नाही कारणे शोधत असतील तर त्यांनी जावे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सुर्वे यांना सुनावले. यानंतर हर्षल सुर्वे चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com