कोल्हापूर : गेल्या काही महिन्यापासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर्स लावल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांच्या सासूरवाडीच्या लोकांनीही संत गोरोबा काकांच्या मंदिरात साकडेही घातले आहे.
अशातच कोल्हापूरचे चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “अजित दादांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री करत नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही”, अशी शपथ राजेश पाटील यांनी घेतली आहे. राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना त्यांनी हा निर्णय घेतला. इतकेत नव्हे तर, काँग्रेस राष्ट्रवादीसह त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याचंं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर राष्ट्रवादीचा (NCP) झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठीच त्यांनी ही भाकरी फिरवली आहे. त्यामुळे आता अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत व चंदगडमध्ये लालदिव्याची गाडी यावी, यासाठी मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असं आवाहन करत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार राजेश पाटील यांनी केलं आहे.
राजेश पाटील म्हणाले की, वाढदिवसाच्या कार्यक्रमांमुळे विरोधक जागरूक होतात. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात वडील नरसिंगराव पाटील यांची एकसष्टी साजरी केली. पण विरोधकांच्या दगाफटक्यामुळेच पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (Kolhapur News)
नव्या सरकारने विकासकामांना दिलेल्या स्थगितीमुळे राज्यातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. चंदगडच्या ट्रामा केअर सेंटरचे काम अद्याप सुरू झाले नाही. कर्नाटकात जे झालं तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात पुन्हा महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर येईल. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावं आणि या जातीयवादी शक्तींना जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.