Supriya Sule In Palkhi Sohala : सुप्रिया सुळेंनी फिरवली भाकरी, पिठलंही हाटले; वारकऱ्यांसोबत झाल्या दंग!

Supriya Sule In Palkhi Sohala Make A roti : अवघा रंग एकचि झाल्याची सुळेंची भावना..
अवघा रंग एकचि झाल्याची सुळेंची भावना..
अवघा रंग एकचि झाल्याची सुळेंची भावना..Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात (Dnyaneshwar Maharaj Palkhi) सहभागी झाल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसह लाखो भक्तांनी टाळ मृदंगाचं वादन करत, ग्यानबा तुकारामचा गजर करत, पालखी सोहळ्यात सुळे सहभागी झाल्या. (Palkhi Sihala)

अवघा रंग एकचि झाल्याची सुळेंची भावना..
Anil Ramod CBI Enquiry: अनिल रामोडांचा पाय खोलात; सीबीआयला मिळाले धागेदोरे, 'या' प्रकरणाची होणार चौकशी

यावेळी सुप्रिया सुळेंनी पालखीतील महाराजांच्या पादुकांवर माथा टेकवत दर्शन घेतले. वारकऱ्यांसह अभंगाच्या तालावर तल्लीन झाल्या. वारकऱ्यांसह सुळे यांनी फुगडीचा ठेका धरला. यावेळी सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसह भाकर बनवली. चुलीवर भाकरी फिरवली. भाकरी बरोबरच त्यांनी झुणका म्हणजे मोठ्या कढईत पिटलंही बनवण्याचा आनंद घेतला.

अवघा रंग एकचि झाल्याची सुळेंची भावना..
Nashik ACB News: महिला निरीक्षक निशा आढाव पाच हजाराची लाच घेताना रंगेहात सापळ्यात !

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "विठ्ठलाची अवीट ओढीने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या वारकऱ्यांना भेटले, वारीत सहभागी झाले. कित्येक शतके नित्यनेमाने वारकरी पंढरीला जातात. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून येणारे वारकरी , टाळ - मृदंग, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. तेव्हा अवघा रंग एकचि झाल्याची अनुभूती येते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.