Sangli News, 24 Mar : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेत्यांनी माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या पराभवासाठी उरण-ईश्वरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली.
मात्र जीवाची बाजी लावत जयंत पाटलांनी आपल्या गटाची सत्ता कायम ठेवली. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना निवडून आणले. पण सांगली जिल्हाधिकारी मलगुंडे यांच्याबाबत अतिक्रमण केल्या संदर्भात तक्रार दाखल झाली आणि त्यामध्ये त्यांचे पद रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी येथील जयकर दिनकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या अर्जावर आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे. पेठ - सांगली रोडवरील बस स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल व लॉजिंगची इमारत अतिक्रमणात असल्याने याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
आनंदराव मलगुंडे यांच्या बाबतीतील या सुनावणीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अर्जात म्हटले आहे की, आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांची एकत्रित मालकीचे पेठ सांगली रोडला बसस्थानकाजवळ असलेल्या भूमापन क्र. ८/१ अ, ८/१ अ १२, ८/१ अ १३, ८/१ ब, ८/२ या ठिकाणी लॉजिंग व शॉपिंग सेंटर इमारत आहे. ही इमारत ही पेठ सांगली राज्यमार्गाला अगदी खेटून उभी आहे.
या इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व बांधकाम नियमितीकरणाबाबतचे जोडलेली सर्व कागदपत्रे, नकाशे याची सही-शिक्क्यानिशी असलेली नक्कल माहिती अधिकारात मागवली आहे. त्याच्या सर्व प्रती जोडून जिल्हाधिकारी यांच्याकडे आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करावे, यासाठी अर्ज देण्यात आला आहे. या अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन नगरपालिकेकडून अहवाल मागितला होता.
त्यानंतर आज (ता. २४) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात यावर सुनावणी होणार आहे. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे, असे जाधव यांचे म्हणणे आहे. या बरोबरच आनंदराव मलगुंडे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून केलेल्या कामकाज व ठराव रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. आज या बाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.