Uttam Jankar-Deepak Salunkhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP : उत्तम जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही; जिल्हाध्यक्षांनी सुनावले

Ajit Pawar Vs Uttam Jankar : मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढू शकतो, असे विधान केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 April : माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासदही नाहीत. त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही एक संबंध नाही, त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज दिले.

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे पारंपारिक कट्टर विरोधक उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते पाटील (Mohite Patil) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी आणि त्यानंतरही जानकर यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत दीपक साळुंखे सांगत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पराभव करूनच मी पक्ष सोडणार आहे, असे वक्तव्य केले होते. त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात रंगली होती. पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देताना अजित पवारांना डिवचण्याचे काम जानकर यांनी केले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीका केली होती. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काढू शकतो, असे विधान केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.

उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कधीच नव्हते, ते पक्षाचे सभासददेखील नाहीत. त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा काही एक संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर आता उत्तम जानकर हे काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.‌

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT