Ashok Chavan News : अशोक चव्हाणांची मोठी राजकीय भविष्यवाणी, म्हणाले 'लोकसभेनंतर...'

Ashok Chavan and Congress : काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ राहून पक्ष सोडलेल्या अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसमधील अतंर्गत कलहावर निशाणा साधणं सुरू केलं आहे.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama

Loksabha Election 2024 : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. तर अद्यापही सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील संपूर्ण जागांवर उमेदवारांची घोषणा झालेली नाही. काही मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मित्रपक्षातच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तर काही ठिकाणी जाहीर झालेला उमेदवार बदलण्याची मागणीही होत आहे. एकीकडे या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू असताना, नुकतच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी मोठी राजकीय भविष्यवाणी केली आहे.

काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ राहून पक्ष सोडलेल्या अशोक चव्हाणांनी आता काँग्रेसमधील अतंर्गत कलहावर निशाणा साधणं सुरू केलं आहे. शिवाय, जास्तीत जास्त काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्याचीही मोहीम हाती घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक राहिलेल्या अशोक चव्हाणांना(Ashok Chavan) पक्षातील दिग्गज नेत्यांबाबत सखोल माहिती असल्याने, ते आता एकएक करून याबाबत गौप्यस्फोट करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan News
Lok Sabha Election News : महायुतीच्या सहा जागांवर तिढा; आघाडीतही दोन ठिकाणी गोंधळ !

दरम्यान एका वृत्तावाहिनीशी बोलताना अशोक चव्हाणांनी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधत, त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढच नाहीतर लोकसभा निवडणुकीअगोदर ज्या प्रकारे काँग्रेसला(Congress) धक्के बसले, त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतरही काँग्रेसला मोठे धक्के बसणार असल्याची राजकीय भविष्यवाणी त्यांनी केली आहे. काँग्रेसमधील उरलेले नेते मोठा राजकीय निर्णय घेतील असं चव्हाण म्हणाले आहेत.

अशोक चव्हाण म्हणाले, संजय निरुपम, मिलिंद देवरा(Milind Deora) यासारख्या काँग्रेसच्या चांगल्या नेत्यांनी पक्ष सोडला. शिवाय अजूनही अनेक नेते पक्षात अस्वस्थ आहेत. कारण, त्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे. त्यामुळे मला खात्री आहे की ते लवकरच योग्य निर्णय घेतील.

Ashok Chavan News
Jalna Loksabha Constituency : वडिलांची मैत्री मुलाने जपली, कल्याण काळेंचा अर्ज भरण्यास अमित देशमुख आले!

याशिवाय एका वृत्तावाहिनीशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले, "मी राजीनामा देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. 12 फेब्रुवारीला मी राजीनामा दिला आहे. तेव्हा कुठंही जागावाटप अंतिम झालं नव्हतं. काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणं भूमिका घ्यायला हवी होती.काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली आहे."
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com