Uttam Jankar-Ajit Pawar-Suraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar : जानकरांची अजितदादांसोबत अर्धा तास चर्चा; मात्र राष्ट्रवादी नेत्याचा भलताच इशारा, 'जानकरांचा पुढचा प्रवास सोबत होऊ देणार नाही'

Uttam Jankar's journey with Ajit Pawar : गाडीतील १५ मिनिटांचा एकत्रित प्रवास आणि कौन्सिल हॉलबाहेरील १५ मिनिटे चर्चा अशी अर्धा तास तिघांमध्येच चर्चा झाली. ही चर्चा केवळ नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावरच झाली की आगामी वाटचालीसंर्दर्भात गुफतगू झाले, याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 02 March : लोकसभा निवडणुकीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करणारे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी थेट अजितदादांच्या गाडीतून एकत्र प्रवास केला, तसेच, अर्धा तास चर्चाही केली, त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार अजितदादांच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. मात्र, अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्याने ‘जानकरांचा पुढचा प्रवास सोबत होऊ देणार नाही,’ असा इशारा दिला आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. ०१ मार्च) पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. नीरा उजव्या कालव्याला पाणी सोडावे, यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे बैठकीच्या अगोदर शासकीय विश्रामगृहात पोचले. त्या ठिकाणी अजित पवार अगोदरच होते. राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते उमेश पाटीलही त्या ठिकाणी होते. कौन्सिल हॉलकडे निघालेल्या अजितदादांनी आमदार उत्तम जानकर आणि उमेश पाटील यांना पाहताच, ‘तुम्ही माझ्या गाडीत बसा’ असे सांगितले.

अजित पवार, आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) आणि उमेश पाटील या तिघांनीच शासकीय विश्रामगृहपासून कौन्सिल हॉलपर्यंत एकाच गाडीतून प्रवास केला. त्यानंतर कौन्सिल हॉलबाहेरही तब्बल १५ मिनिटे त्या तिघांमध्ये चर्चा सुरू होती. म्हणजे गाडीतील १५ मिनिटांचा एकत्रित प्रवास आणि कौन्सिल हॉलबाहेरील १५ मिनिटे अशी अर्धा तास तिघांमध्येच चर्चा झाली. ही चर्चा केवळ नीरा उजवा कालव्याच्या पाण्यावरच झाली की आगामी वाटचालीसंर्दर्भात गुफतगू झाले, याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे.

या भेटीसंदर्भात राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांनी स्पष्टीकरण देतानर्थ उत्तम जानकरांशी माझी जुनी मैत्री आहे. माळशिरसला नीरेच्या पाण्याची किती आवश्यकता आहे, हे सांगण्यासाठी आमदार जानकर हे अजित पवार यांना भेटले. त्या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे आवाहन उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तम जानकर यांच्या अजित पवारांसोबतच्या गाडीतून प्रवास करण्याच्या भूमिकेवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमदार उत्तमराव जानकर यांनी काल दादांसोबत गाडीत बसून प्रवास केला. हा दादांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्यांना गाडीत बसू दिलं. परंतु राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून निवडणुकीच्या काळात पात्रता नसताना जानकरांनी दादांवर खालच्या पातळीवर केलेली टीका आम्ही विसरू शकत नाही. अजितदादांची जाहीर माफी मागितल्याशिवाय जानकरांचा पुढचा प्रवास सोबत होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT