Rohit Pawar : जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज; रोहित पवारांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

Chhaava Cinema : मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा, याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 02 March : आमदार रोहित पवार यांनी छावा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद बोलून दाखवल्याची चर्चा त्यांच्या आजच्या समाज माध्यमातील पोस्टवरून रंगली आहे. छावा चित्रपटाच्या माध्यमातून ‘जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते, याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो,’ असे विधान आमदार पवार यांनी केल्याने त्यांना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल उपस्थित होतो आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पक्षसंघटनेत काम करण्यासाठी इच्छूक होते. मात्र नुकत्याच झालेल्या संघटनेतील पद वाटपात रोहित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. पक्ष विस्तारण्याची जबाबदारी विभागनिहाय आमदार आणि खासदारांकडे देण्यात आलेली आहे. मात्र, त्यात रोहित पवार यांना कुठेही संधी दिलेली नसल्याचे दिसून येत आहे, त्याचा या ट्विटशी संबंध जोडला जात आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सध्या छावा चित्रपटाचा (Chhaava Movie) सर्वत्र बोलबाला आहे. तब्येतीत सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी, तर आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांचं अफाट कर्तृत्त्व, उत्तुंग नेतृत्त्व, असीम त्याग, पराक्रम, वाघासारखं धैर्य आणि शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार!

Rohit Pawar
INDIA Alliance: नितीश कुमार, ममता यांच्यानंतर आता 'या' नेत्याच्या खाद्यांवर येणार 'ही' मोठी जबाबदारी; BJP विरोधात मैदानात उतरणार

छावा चित्रपटाच्या माध्यमातून आभाळाएवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला, तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. अनन्वित अत्याचार करुनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत. किंबहुना मरण स्वीकारलं; पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता, असा दावाही पवार यांनी केला आहे.

ते म्हणाले, मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा, याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही, तर अनेकजण जबाबदार होते, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Rohit Pawar
Trupti Desai : पुण्याला बदनाम केलं म्हणता तर स्वारगेट नेपाळमध्ये आहे का? तृप्ती देसाईंचा रुपाली पाटील ठोंबरेंना सवाल

लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा छावा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो. पण, काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते, याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत, तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com