Sanjay Raut Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्षांना विकत घेतले..! राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप...

Reply to Shambhuraj Desai Statement : देसाईंनी आपल्या आजोबांचा इतिहास एकदा वाचावा. ते किती न्यायप्रिय माणूस होते आणि आपण काय करतोय समजून घ्याव, असा दिला सल्ला.

Vishal Patil

Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना कुणाची, याबाबतचा निकाल दिला. शिंदे गटाची शिवसेना आणि शिंदे - ठाकरे दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचे निकालात ठरवले. अपात्रतेचा निकाल पात्र असा दिला असला तरी शिवसेना शिंदे गटाची असल्याचा निकाल दिल्याने आता विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.  

कराड येथे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी न्याय देणारे विधानसभा अध्यक्ष विकत गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना कुणाची यांचा निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी घटना आणि प्रस्ताव याबाबत पोचपावती दाखवत शिंदे गट आणि विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला होता.

त्याला काल शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा कोर्टात जावे, असे म्हटले होते. त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, आम्ही कोर्टात जावू अथवा जनतेच्या न्यायालयात जावू. आज देशातील सर्व घटनात्मक संस्थावर दबाव असल्याचे आम्ही खात्रीने सांगतो. विधानसभा अध्यक्षांना विकत घेतले गेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वोच्च न्यायालयाने ज्याकडे न्याय देण्याचे काम केले होते. तोच जर विकला गेला, तर तुम्ही कोणाकडे न्याय मागणार. देसाईंनी आपल्या आजोबांचा इतिहास एकदा वाचावा. ते किती न्यायप्रिय माणूस होते आणि आपण काय करतोय समजून घ्याव, एवढंच मी सांगेन. बाळासाहेब देसाईंचा आदर्श आजही आम्ही बाळगतो. बाळासाहेब ठाकरेंना बाळासाहेब देसाईंविषयी फार प्रेम आणि आदर होता.

तेव्हा आपल्या आजोबाचं चरित्र वाचावं, त्यांच्याकडे नसेल तर माझ्याकडचे पाठवेन, असेही राऊत म्हणाले.

मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले होते... 

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला. या निकालावर तुम्ही समाधानी नसाल, तर वरच्या कोर्टात जा. उगाच रोज उठायचं आणि रोज नवीन एक वक्तव्य करायचं. काहीतरी नवीन कागद दाखवायचा.

तुम्हाला कोर्टाची दारे उघडे आहेत. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. योग्य पातळीवर योग्य सुनावणी होईल. साक्षी पुरावे बघितले जातील, असे सांगत कोर्टात जाण्याचा सल्ला ठाकरे गटाला शंभूराज देसाईंनी दिला होता.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT