Kolhapur: मुश्रीफांनी जे ठरलं तेच सांगितलं; चंद्रकांतदादांच्या दाव्यातील हवाच काढली..

Kolhapur Politics : निवडून आणण्याची जबाबदारी आमची
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघमहायुतीत कोणाकडे राहतील याची उलट सुलट चर्चा होते. सुरुवातीपासून विद्यमान खासदार असणाऱ्या गटाकडेच या जागा राहतील अशी चर्चा होती.

मात्र भाजपचे नेते आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन पैकी एका जागेवर दावा केला होता. पाटील यांच्या दाव्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर असल्याचे बोलले जात होते. मात्र या दाव्याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हवाच काढून घेतली आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय झालेला आहे. हे दोन्ही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडेच राहतील, असे सांगत हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राहुल आवाडे यांनी उमेदवारी मागितली आहे की नाही याबाबत मला कल्पना नाही. मात्र या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

भविष्यात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच चांगले काम करू शकतात. तेच देशाला महासत्ता बनवू शकणार आहेत. त्यामुळे लोक मोदींच्या कामाकडे पाहून त्यांना पाठिंबा देत आहेत. राज्यातील ४८ जागी महायुती विजयी होणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातृन राहुल आवाडे यांची चर्चा होती. त्यांना भाजपकडून तिकीट दिले जाईल. त्यामुळे त्यांच्याच नावाची चर्चा या मतदारसंघात होती. मात्र, मुश्रीफ यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आवाडे यांच्या लोकसभेच्या चर्चेच्या विषयाला पूर्णविराम मिळेल अशी चर्चा आहे.

Edited by: Mangesh Mahale

Kolhapur Politics
BJP Rajasthan: राजस्थानमध्ये भाजप 'या' चेहऱ्यांवर डाव टाकणार; विजयी आमदारही लढवणार लोकसभा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com