Vijay Auti vs Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vijay Auti vs Nilesh Lanke : 'तुमचा पक्षच अस्तित्वात कुठे'; विजय औटींनी अजित पवार गटाच्या नेत्यांना डिवचलं !

Ahmadnagar Political  News : आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यातील संघर्ष वाढणार !

राजेंद्र त्रिमुखे

Ahmadnagar News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतर नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या परिस्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपलं राजकीय अस्तित्व शोधताना दिसत आहेत. अशातच विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेले माजी आमदार विजय औटी यांनी तुमचा पक्षच अस्तित्वात कुठे, असा सवाल करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांना डिवचलं आहे. त्यामुळे पुढील काळात आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यातील संघर्ष आणखी वाढताना दिसणार आहे. 

मविआ सरकार असताना विधानसभेचे उपाध्यक्ष राहिलेले माजी आमदार विजय औटी यांच्याकडे एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. त्यांनी 2019 पर्यंत सलग तीन टर्म पारनेर मतदारसंघाचे शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले आहे. 2019 मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नीलेश लंकेंनी त्यांचा पराभव केला. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत नीलेश लंके अजित पवार यांच्यासोबत महायुतीत आहेत. त्यामुळे विजय औटी यांची राजकीय भूमिका काय असणार, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत औटी, यांना विचारले असता ते म्हणाले, " आघाडी, महायुती स्थापन होताना अमुक-अमुक पक्ष एकत्र येत असतात आणि त्यांना नावे असतात. मात्र, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा याबाबत सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे तुमचा पक्षच अस्तित्वात आला का? असा प्रश्न औटी यांनी अजित पवार गटांच्या नेत्यांना केला आहे. तसेच कोण इकडून- तिकडे, तिकडून इकडे आले-गेले, याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे औटी म्हणाले. " 

"सध्याच्या सरकारमुळे गेल्या दोन वर्षांपासून जनतेत मोठी अस्वस्थता आहे. राज्याला दोन-दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आता ग्रामपंचायतीत दोन उपसरपंच का नकोत असा प्रश्न लोकं उपस्थित करू लागले आहेत. सामाजिक-राजकीय अस्थिरतेमुळे नागरिकांतील अस्वस्थता वाढत असल्याचा दावा औटी यांनी केला आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT