Solapur, 17 August : मुख्यमंत्री महोदय, काही लोक सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात कुरघोड्या करत आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा शहर उत्तर आहे. आजपर्यंत तुम्ही जे जे आदेश दिले आहेत, ते आम्ही मानत आलो आहेत. पण, शहर उत्तर मतदारसंघातील माझ्या भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर ते योग्य उत्तर देतील, असं मी तुम्हाला सांगतो, ही मनातील खदखद सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच बोलून दाखवली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथे बांधण्यात आलेल्या 1345सदनिकांचे लोकार्पण आज (ता. 17 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी आपल्या मतदारसंघात होणाऱ्या हस्तक्षेपाबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली आहे.
दरम्यान, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील (Solapur City North Constituency) कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचे आमदार देशमुख यांनी जाहीरपणे सांगितले. पण, त्यांच्या कार्यकर्त्यांना कोण त्रास देतेय. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर भाजपमध्ये असलेल्या वादाबाबत देशमुख यांनी जाहीरपणे आपल्या मनातील खंत मांडली काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
आमदार देशमुख म्हणाले, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात चाळीस वर्षे भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून येत आहे. या मतदारसंघात फक्त भारतीय जनता पक्षाचं राज्य चालतं. दुसरं कोणाचं चालत नाही. देवेंद्र फडणवीस जे सांगतील, ते निश्चित घडतंय. कारण कमी वयात राजकारणातला बाप माणूस हे फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत.
या लोकांनी मला या मतदारसंघातून पाच वेळ निवडून आणले आहे. ह्याच कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो आहे. आजकाल काही कार्यकर्ते नाराज असतात. कारण, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशी तक्रार देशमुख यांनी केली. तसेच सोलापूर शहर उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांना आमचे कार्यकर्तेही योग्य उत्तर देतील, असे देशमुखांनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगून टाकले.
सोलापूरवरची मर्जी कमी झाल्यासारखं वाटतंय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरवरची मर्जी कमी झाल्यासारखं वाटतंय. कारण मुख्यमंत्री असताना ते नागपूरला गेले नव्हते, तेवढे सोलापूरला आले होते. पण त्यांचे आता आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी ‘घार उडे आकाशी; पण चित तिचे पिल्लापाशी’ याप्रमाणे फडणवीस यांचे लक्ष सोलापूरकडे असते, असेही विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.