
Solapur, 17 August : विजयमालक (आमदार विजयकुमार देशमुख) म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं सोलापूरवरचं प्रेम कमी झालं आहे काय. मालक तुम्ही लोक असताना माझं सोलापूरवरचं प्रेम कसं कमी होईल. तुमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे सोलापूरवर माझं प्रेम कायम राहणार आहे. मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री होतो, तरी सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत सांगितले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथे राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेत बांधण्यात आलेल्या 1348 सदानिकांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, अभिजीत पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी अडीच वर्षां उपमुख्यमंत्री होतो, त्या वेळीही मी सोलापूरचा (Solapur) ट्रॅक सुटू दिला नव्हता. सोलापूरची पाणी योजना पूर्णपणे अडचणीत होती. त्या अडचणी दूर करून त्याचे नव्याने ट्रेंडर काढून त्याचे कॉन्ट्रक्ट केले होते. त्यावेळी माझ्याकडे अर्थखाते होते, त्यामुळे पैसेही उपलब्ध करून दिले होते. हे सर्व सोपस्कर पूर्ण करून आपण सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण केले आहे.
सोलापूरसाठी आपण आता बंद पाईपद्वारे पाणी आणत आहोत. डब्ल्यूटीपीचे कामही आपण करणार आहोत. हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत. त्यांना माहिती आहे की, एकदम सगळं मागितलं, तर देणार नाहीत, त्यामुळे जसं साडेआठशे कोटी रुपयांचे बंदिस्त जलवाहिनीचे काम झाले, असे फडणवीस यांनी नमूद केले.
ते म्हणाले, बंदिस्त जलवाहिनीचे काम झाल्यानंतर हे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले, आमचे पाईपलाईनचे काम झाले आहे. पण आमची पाणी वितरणाची व्यवस्था जुनी आहे. सोलापूरला रोज पाणी द्यायचे असेल तर आम्हाला नवीन वितरण व्यवस्था टाकावी लागेल. अतिरिक्त टाक्या बांधव्या लागतील, अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल. मी म्हटलं करा. मला वाटलं दोनशे-तीनशे कोटींची योजना असेल. माझ्याकडे हे लोक साडे आठशे कोटींची योजना घेऊन आले. पण काळजी करू नका, त्याही योजनेला आपण मान्यता दिली आहे.
सोलापूर शहरातील पाणी वितरणाची सुमारे साडेआठशे कोटी रुपयांची योजना करून सोलापूरसारख्या प्रमुख शहरात हे दक्षिणेतील अत्यंत महत्वाची महापालिका आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक घरी रोज पाण्याचं पाणी गेलंच पाहिजे. असा आपला आग्रह आहे. त्यादृष्टीने आपण शहरातील पाणी वितरण योजनेलाही मान्यता देत आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.